Chhatrapati Sambhajinagar Sports Complex Scam : छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलात २१ कोटी ५९ लाखांचा घोटाळा उघड झाला आहे. २३ वर्षीय आरोपी हर्षल शिरसागर कमी पगारात असून त्याने नवी बीएमडब्ल्यू कार आणि गर्लफ्रेंडसाठी आलिशान फ्लॅट घेतला. यशोदा शेट्टी आणि तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे.
हर्षलकुमार अनिल शिरसागर (वय २३) राहणार बीड बायपास असे आरोपीचे नाव असून तो फरार आहे. तर यशोदा जयराम शेट्टी (वय 38) वर्ष तिचा पती जीवन कार्यप्पा विजेंडा (वय ४७) गादीया विहार असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी क्रीडा अधिकारी तेजस दीपक कुलकर्णी (वय ३६) नंदिग्राम कॉलनी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फेब्रुवारी 2022 पासून दिशा फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हर्षल याला कंत्राटी ऑपरेटर म्हणून नियुक्त केले. तर 2023 साली वेब मल्टी सर्विसेस ने लिपिक म्हणून यशोदा शेट्टी हिलानी निवड केलं. हर्षलकुमारने क्रीडा उपसंचालकांची बनावट सही करून बँकेची व्यवहार केला. यासाठी स्वतःचा मेल आयडी आणि मोबाईल नंबर चा वापर करून सहा महिन्यात त्तब्बाल 21 कोटी 59 लाख रुपयांचा घोटाळा केला. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने यशोदा आणि तिच्या पतीला अटक केली आहे. तर मुख्य आरोपी हर्षल कुमार हा आलिशान गाडी घेऊन फरार आहे.
दोन मैत्रिणींवर उडवला पैसा…..
हर्षल कुमारने घोटाळ्यातील पैशातून मैत्रिणीला खुश ठेवण्यासाठी वाटेल ते केलं. शहरातील हाय प्रोफाईल एरिया म्हणून ओळख असलेल्या विमानतळासमोरील सोसायटीत नुकताच चार बेडरूमचा अल्ट्रा लक्झरी फ्लॅट घेतला. तर दुसरा दोन बेडरूमचा आलिशान फ्लॅट मैत्रिणीसाठी दिला. घोटाळा केल्यानंतर चार महिन्यात हर्षल ने 1.30 कोटी रुपयांची बीएमडब्ल्यू कार तर 32 लाखांची बीएमडब्ल्यू दुचाकी घेतली. या प्रकरणाचा पोलीस तपास करत असून आणखी काही संपत्ती खरेदी केले आहे याचाही तपास पोलीस करत आहेत.