काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी बीड, परभणी घटनेतील पीडित कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रणिती शिंदेंनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. सरकार परभणी आणि बीड प्रकरणातील सत्य लपवायचा प्रयत्न करतंय असं त्या म्हणाल्या. मात्र आम्ही दोन्ही कुटुंबियांना न्याय मिळवून देणार अशी भूमिका त्यांनी घेतली. तर सरपंच देशमुखांच्या कन्येला सुरक्षेची गरज असल्याचे देखील प्रणिती शिंदेंनी सांगितले.