संजय शिरसाट यांनी राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावर टीका केली आहे. राहुल गांधी सूर्यवंशी कुटुंबियांच्या सांत्वनासाठी परभणीत येत आहेत. मात्र त्यांना सहानुभूती नसून ते राजकारणासाठी येत असल्याची टीका शिरसाटांनी केलीय. तर शिरसाट देखील आज बीड आणि परभणी दौरा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.