Akola News : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड-तेल्हारा राज्य मार्गावर भीषण अपघात घडला आहे. लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटून भीषण अपघात घडला आहे.
घटनेची माहिती मिळताच हिवरखेड ठाणेदार गजानन राठोडांसह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. जखमींना उपचारासाठी आधी तेल्हारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर अकोला येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
Fact Check: पतीच्या भीतीने मुस्लीम महिलेने बॉयफ्रेंडला पेटीत लपवलं? व्हायरल VIDEOचं सत्य काय?
कार चालकाचे नाव शेख हुसेन आहे. एकूण ५ जखमींपैकी एक व्यक्ती दगावला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघाताचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. शेख हुसेन हे हिवरखेड येथे एका लग्न समारंभाहून परतत असताना हा भीषण अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की कारचे चारही चाके वरच्या दिशेने पलटून प्रवासी त्याखाली दबले गेले होते.