Eknath Shinde In Nagpur : उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका करत त्यांना पराभवातून शिकण्याचा सल्ला दिला आहे. तसंच पराभवातून शिका अन्यथा संपून जाल असं म्हणत विरोधकांवर टीकाही केली आहे.
‘जनतेशी संबंधित मुद्दे सभागृहात मांडण्याऐवजी विरोधक केवळ प्रसारमाध्यमांपुढे जाऊन सरकारवर आरोप करण्यातच धन्यता मानतात. इतका मोठा पराभव होऊनही यातून धडा घेतलेला नाही. अजूनही वेळ गेलेली नाही पराभवातून शिका आणि कामाला लागा, अन्यथा संपून जाल’, असा सल्ला देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
मुख्यमंत्र्यांना भीती, त्यामुळेच कारवाई नाही; मंत्र्यांना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न, विरोधकांकडून सरकारवर ताशेरे
विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना शिंदे बोलत होते. ‘परभणी, बीड, कल्याण या घटना घडल्या असल्या तरी हे कायद्याचे राज्य आहे. गुन्हेगारांवर कठोर कारवाई होणार आहे. हे सर्वसामान्यांना न्याय देणारे, हक्काचे मिळवून देणारे सरकार आहे. विरोधकांकडून आमच्यावर ईव्हीएमचे सरकार अशी टीका करत आरोप करण्यात येत असले तरी आम्ही त्याला उत्तर देण्यापेक्षा जनतेचे काम करण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे विधानसभेत अनपेक्षित यश मिळाले. आम्हाला कधीही वाटले नव्हते इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळेल.
मारकडवाडीची राज्यभर चर्चा सुरू असताना एका गावात चोख बंदोबस्तात बॅलेट पेपरवर मतदान, मतदारांचा दणदणीत विजय
अजूनही वेळ गेलेली नाही, पराभवातून धडा घ्या अन्यथा संपाल…. एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका
मात्र, विरोधकांनी अजूनही यातून धडा घेतलेला नाही. सभागृहात कमी आणि प्रसारमाध्यमांसमोर बोलण्याला विरोधकांनी प्राधान्य दिले. निवडणुकीच्या निकालानंतर हे स्पष्ट झाले जनतेला काम करणारे लोक आवडतात, घरी बसणाऱ्यांना घरीच बसवण्यात येते’, अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली. आता जनतेने मोठे बहुमत देत पुढील पाच वर्षे दिली असल्याने अधिक जोमाने कामे करणार आहे. त्यामुळे विरोधकांनी आरोपांचे राजकरण न करता जनतेचे प्रश्न सोडवण्यावर चर्चा केली तर चांगले होईल असा सल्लाही यावेळी शिंदे यांनी दिला. नागपूरचे वातावरण लंडनसारखे आहे. काही जण केवळ आनंद, भेटीगाठी, पर्यटन करून निघून जातात. जनतेच्या प्रश्नाशी त्यांना काही घेणे नसते अशी टीकाही त्यांनी केली.