हिवाळी विधानसभा अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. तर आज बीडमध्ये मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या गावी मस्साजोग येथे शरद पवार जाणार असून त्यांच्या परिवाराची भेट घेणार आहेत. त्यानंतर परभणीमध्येही सोमनाथ सुर्यवंशी याच्याही घरी पवार जाणार आहेत. या दोन्ही प्रकरणांवर पवार दुपारी परिवाराची भेट घेतल्यावर पत्रकार परिषद घेणार आहेत. शरद पवार काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कल्याण येथे मराठी माणसांना मारहाण करणाऱ्यांना पोलीस ताब्यात घेत आहेत. त्यासोबतच सर्व क्षेत्रातील घडामोडी जाणून घ्या.