• Thu. Dec 26th, 2024
    परभणीतील भीमसैनिक पुन्हा एकवटले, आंबेडकरी समाजाच्या वतीने आजपासून आंदोलन

    Authored byसूरज सकुंडे | Contributed byडॉ. धनाजी चव्हाण | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Dec 2024, 7:21 pm

    परभणीमध्ये संविधानाच्या प्रतीची विटंबना झाल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. शहरामध्ये काही ठिकाणी अनुचित प्रकार घडल्यामुळं पोलीस प्रशासनाने कोंबिंग ऑपरेशन सुरु केलं. पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतलं. दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू झाला असून सदर घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी तसेच कोंबिंग ऑपरेशन राबवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी भीमसैनिकांकडून व्यक्त होत आहे. या मागणीसाठी परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात भीमसैनिकांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed