बीडमध्ये सरपंच देशमुख प्रकरणात न्याय मागण्यासाठी २८ तारखेला मोर्चा निघणार आहे. या मोर्चात नागरिक म्हणून सहभागी होणार असल्याचं मनोज जरांगेंनी जाहीर केलंय. एका लेकीने आपल्या वडिलांसाठी हाक दिली असून यात राजकारण आणू नका असं जरांगे म्हणाले. सर्वांनी मोर्चात सहभागी व्हा, असे आवाहन जरांगेंनी मस्साजोग गावातून केले आहे.