• Thu. Dec 26th, 2024
    स्पीड बोट धडकली, एकाचा पाय कापला गेला, तो आमच्या बोटीत पडला; प्रत्यक्षदर्शीनं थरार सांगितला

    गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाच्या दिशेनं जाणारी प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली आहे. या बोटीवर ८० प्रवासी होते. उरणजवळ या बोटीला नौदलाच्या एका स्पीड बोटनं धडक दिली.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाच्या दिशेनं जाणारी प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली आहे. या बोटीवर ८० प्रवासी होते. उरणजवळ या बोटीला नौदलाच्या एका स्पीड बोटनं धडक दिली. स्पीड बोट अतिशय वेगात होती. ती धडकताच प्रवासी बोटीत पाणी शिरु लागलं. हळूहळू ती बुडू लागली. बोटीतील ३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बोटीमधील ५ प्रवासी बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे.

    नीलकमल नावाची बोट दुपारी तीनच्या सुमारास गेटवे ऑफ इंडियाकडून एलिफंटाच्या दिशेनं निघाली. या बोटीची क्षमता १३० प्रवाशांची होती. अपघात झाला, त्यावेळी बोटीत ८० प्रवासी होते. अपघातात ३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ५ जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. स्पीड बोटनं धडक दिल्यानं बोट बुडाली.
    आंबेडकरांच्या अपमानाचे आरोप, शहांची तातडीची प्रेस; विधानाची मोडतोड केल्याचा दावा
    ‘प्रवासी बोट एलिफंटाला जात होती. तेव्हा नेव्हीच्या स्पीड बोटीनं तिला सुसाट वेगात तिला एक फेरी मारली. त्यानंतर स्पीड बोट प्रवासी बोटीपासून थोडी दूर गेली. त्यानंतर नागमोडी वळणं घेत ती प्रवासी बोटीच्या दिशेनं आली. स्पीड बोटीनं प्रवासी बोटीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की प्रवासी बोटीचं खूप नुकसान झालं. बोटीत पाणी भरु लागलं. काही वेळात संपूर्ण बोट उडाली,’ अशी माहिती बोटीच्या मालकांनी दिली.

    ‘प्रवासी बोटीत सुरक्षेच्या सगळ्या उपाययोजना केलेल्या होत्या. बोटीत लाईप जॅकेट्सदेखील होते. लाईफ जॅकेट्स बोटीत अनिवार्यच आहेत,’ असं मालकानं सांगितलं. त्यावर त्यांच्या शेजारी असलेले शेकापचे नेते आणि माजी आमदार जयंत पाटील यांनी जॅकेट्सचा प्रश्नच नाही. नेव्हीच्या बोटनं पूर्ण वेगात बोटीला धडक दिली. त्यात बोटीचे दोन तुकडे झाले. त्याला बोटीचा मालक काय करणार?, असा प्रश्न उपस्थित केला.
    Ajit Pawar: अजित पवारांना ‘नॉट रिचेबल’ होण्याचा सल्ला कोणी अन् का दिला? इनसाईड माहिती समोर
    बुडालेल्या प्रवासी बोटात असलेल्या एकानं अपघाताचा थरार सांगितला. ‘आम्ही साडे तीनच्या सुमारास बोटीनं निघालो. त्यानंतर ४० ते ४५ मिनिटांनी बोटीला अपघात झाला. एका स्पीड बोटीनं आमच्या बोटीभोवती चक्कर मारली. त्यानंतर याच बोटीनं पूर्ण वेगात आमच्या बोटीला धडक दिली. त्या बोटीत ८ ते १० जण होते. स्पीड बोट धडकताच त्यातल्या एकाचा पाय कापला गेला. त्याचा जागीच मृत्यू झाला. धडक जोरदार असल्यानं तो आमच्या बोटीत आला,’ असं अपघाताचा साक्षीदार असलेल्या एकानं सांगितलं.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed