Santosh Dshmukh Murder Case CCTV Footage : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधी आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या प्रकरणामध्ये हा मोठा पुरावा तपासासाठी पोलिसांना होऊ शकतो. मात्र मयत सरपंच संतोष यांचे भाऊ आरोपींसोबत काय करत होते? जाणून घ्या.
मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात पीएसआय राजेश पाटील आणि आरोपी सुदर्शन घुले यांचा केज शहरातील बसंत बिहार या उडपी हॉटेल मधला सीसीटिव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर, आता दुसरा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये पीएसआय राजेश पाटील, आरोपी सुदर्शन घुले आणि मयत संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख हा देखील त्या दोघांसोबत चर्चा करत आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये अवघ्या ४ मिनिटांचा अंतर आहे. दरम्यान आता हा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळं या प्रकरणाची देखील चौकशी करावी, अशी मागणी केली जातं आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरण, पोलीस अधिकारी राजेश पाटील आणि आरोपी भेटल्याचा व्हिडीओ आला समोर…#SantoshDeshmukh #Beedcrime #beed pic.twitter.com/vMcpSvfI8o
— Harish Malusare (@harish_malusare) December 17, 2024
सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीसोबत पीएसआय चहा प्यायला आला आहे. त्यावेळी संतोष देशमुख यांचे भाऊ तिथे बसले होते, तेव्हा हॉटेलमधील वेटरला बोलावून त्यांनी धनंजय देशमुख यांना बोलावून घेतलं. आरोपी सुदर्शन घुले, पीएसआय राजेश पाटील आणि धनंजय देशमुख तिघेही चहा प्यायले. त्यावेळी चहा झाल्यावर धनंजय देशमुख यांना दोघांना बिल देऊ दिले नाही. स्वत: दोघांचेही बिल त्यांनी भरले, आरोपी घुले पैसे देत होता मात्र त्यांना धनंजय यांनी हाताने पाकिटामधील पैसे ठेवायला लावले. त्यांनंतर काऊंटरपासून दोघे गेले, धनंजय देशमुख पुन्हा आपल्या टेबलला जाऊन सहाकाऱ्यांसोबत बसल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळालं.
दरम्यान, संतोष देशमुख यांची हत्याहोण्याआधी एक दिवस आरोपी सुदर्शन घुले, पीएसआय पाटील आणि धनजंय देशमुख यांचे सीसीटीव्ही फुटेज असल्याचं बोललं जात आहे. यावेळी आमचं भांडण मिटल्याचं पाटील यांच्याशी बोलणं झाल्याचं धनंजय देशमुख यांनी सांगितलं.