Pune Railway Division: गेल्या आठ महिन्यांत पुणे रेल्वे विभागाने सात लाख ९१ हजार टन साखर वाहतूक केली आहे. त्यातून रेल्वेला सुमारे २२० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत १०० कोटी रुपयांनी जास्त आहे.
पुणे रेल्वे विभागाला प्रवासी वाहतुकीनंतर सर्वाधिक उत्पन्न मालवाहतुकीतून मिळते. त्यात प्रामुख्याने साखर, पेट्रोलियम पदार्थ आणि ऑटोमोबाइल वाहतुकीचा समावेश आहे; पण गेल्या वर्षी साखर वाहतुकीत किंचित घट झाली होती. त्यामुळे रेल्वेची साखर वाहतूकदेखील कमी झाल्याचे दिसून आले होते. मात्र, यंदा पुन्हा साखर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबपर्यंत सव्वाचार लाख टन साखरेची वाहतूक झाली होती; पण यंदा नोव्हेंबर अखेरपर्यंत आठ लाख टन साखरेची वाहतूक झाली आहे. त्यातून रेल्वेला २२० कोटी रुपयांचे उत्पन्न वाढले आहे.
पुणे जिल्ह्याला चार मंत्रिपदे; ४६ वर्षांनंतर माधुरी मिसाळ यांच्या रुपाने महिला मंत्री
आठ महिन्यांत ३६७ कोटींचे उत्पन्न
गेल्या आठ महिन्यांत पुणे रेल्वे विभागाचे मालवाहतुकीतून मिळणारे उत्पन्न २७ टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर वाहतुकीतून ८६ टक्के उत्पन्नात वाढ झाली आहे. आठ महिन्यांत मालवाहतुकीतून रेल्वेला ३६७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यात सर्वाधिक वाटा साखरेचा आहे. गेल्या वर्षी याच काळापर्यंत २८७ कोटी रुपयांचे उत्पन्न रेल्वेला मालवाहतुकीतून मिळाले होते.
पाटील कुठे गेले? राज्यपाल कागद घेऊन रेडी, नवे मंत्री स्टेजवर दिसेनात, शोधाशोधीनंतर समजलं…
येथून पाठवली जाते साखर
पुणे विभागातून प्रामुख्याने कोल्हापूर, सातारा, सांगली, कराड, मिरज, लोणंद, बारामती येथून साखरेची वाहतूक करणाऱ्या रेल्वे गाड्या पाठविल्या जातात. त्या प्रामुख्याने ‘जेएनपीटी’ मुंबई आणि गुजरातमधील कांडला पोर्टपर्यंत साखर घेऊन जातात. ही साखर परदेशात जहाजाद्वारे पाठवली जाते. काही साखर उत्तर भारतातील राज्यांतदेखील पाठवली जाते.