• Fri. Dec 27th, 2024
    जाहीर सभेत शब्द देऊनही मंत्रिपद नाकारलं, संजय कुटेंचे समर्थक खवळले, फडणवीसांच्या घरावर धडकणार

    Sanjay Kute supporters angry : नव्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी समर्थकांना आशा होती. मात्र मंत्रिपदाच्या हुलकावणीने नाराज झालेले कुटे समर्थक फडणवीसांना जाब विचारणार आहेत

    Sanjay Kute : जाहीर सभेत शब्द देऊनही मंत्रिपद नाकारलं, संजय कुटेंचे समर्थक खवळले, फडणवीसांच्या घरावर धडकणार

    बुलढाणा : भाजप आमदार आणि माजी मंत्री संजय कुटे यांना यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. व्हॉट्सअप-फेसबुक सारख्या सोशल मीडियावरुन कुटे समर्थकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध व्यक्त केला आहे. कुटेंचे कार्यकर्ते आज फडणवीसांच्या नागपुरातील घरावर धडक देणार असल्याची माहिती आहे.

    संजय कुटे हे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी भाजपचे बुलढाणा जिल्ह्याध्यक्षपद भूषवले आहे. सध्या ते प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष आहेत. कुटेंनी सलग तीन वेळा आमदारकी मिळवली आहे. फडणवीस सरकारमध्ये अल्प काळासाठी त्यांनी कामगार मंत्रालयाची धुरा सांभाळली होती. नव्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी समर्थकांना आशा होती. मात्र मंत्रिपदाच्या हुलकावणीने नाराज झालेले कुटे समर्थक फडणवीसांना जाब विचारणार असल्याचं वृत्त ‘एबीपी माझा’ने दिलं आहे.

    व्हॉट्सअपवरील मेसेज काय?

    १. चलो नागपूर, जाब विचारण्यासाठी, अन्याय विरोधात आवाज उचलून फडणवीस साहेब यांना उत्तर द्यावेच लागेल, असे का केले. सकाळी आपआपल्या परीने चार वाजेपर्यंत नागपूर ला पोहचणे, मी जात आहे आपण ही यावे…

    २. विरोधकांनी एवढा जोर लावल्यानंतरही भाऊ आपले मंत्री होणार, आपल्या मतदारसंघाचा विकास होणार, या हेतूने विरोधक असतील, पण त्यांनी सुद्धा छुप्या मार्गाने वोटिंग केले, विरोधक हरुन पण जिंकले आणि आपण जिंकून पण हरलो
    Devendra Fadnavis : देवाभाऊंकडून विश्वासघात! २० हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; ५० हजारांच्या मताधिक्यानंतरही फडणवीसांनी शब्द फिरवला
    ३. प्रथम आपले मनःपूर्वक अभिनंदन, आपण मोठ्या संघर्षातून ही सत्ता आणली परंतु या संघर्षात मोठी भूमिका निभावणारे, आपल्या प्रत्येक निर्णयाला डोळे बंद करून पाठिंबा देणारे आमचे नेते, कर्तव्यदक्ष आमदार डॉ संजुभाऊ कुटे यांना आपण आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिल्याने आपण आमच्या मतदारसंघावर मोठा अन्याय केला आहे. आम्ही सर्व आपणास न्याय देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून बघत होतो पण आपण त्यावर खरे उतरले नाही.
    BMC Elections : मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजपचे ‘शक्ती’प्रदर्शन, तीन बड्या चेहऱ्यांना ताकद
    पाचवेळा निवडणूक जिंकूनच नव्हे तर आपण दिलेल्या प्रत्येक जबाबदारीवर खरे उतरणारे आमचे नेते आमदार डॉ संजुभाऊ कुटे सारख्या माणसाला न्याय देऊ शकले नाही. असं आपण करायला नको होते, आपण वरवट बकाल येथे 2019 च्या निवडणुकीत जाहीर सभे मध्ये शब्द दिला होता की आपण मोठ्या अंतराने कुटे साहेब यांना निवडून द्या तितकीच मोठी जबाबदारी मी त्यांना देईन, पण आपल्या पक्षासोबत उद्धवसाहेब ठाकरे यांनी गद्दारी केली. पुढे आपण शिवसेना फोडून सत्ता आणली.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed