• Sat. Dec 28th, 2024
    पोलीस व्हायचं स्वप्न अधुरं; व्यायाम करताना पाण्यात उतरले, अंदाज न आल्यानं तरुण-तरुणीचा अंत

    Chandrapur Girl and Boy Dies After Drowning: चंद्रपुरातील आदर्श फिजिकल ग्रुपचे संचालक आदर्श चिवंडे हे पोलीस भरतीसाठी सराव करण्यास प्रशिक्षण केंद्र चालवतात.

    हायलाइट्स:

    • पोलीस व्हायचं स्वप्न भंगलं
    • पैनगंगा नदीपात्रात बुडून तरुण-तरुणीचा मृत्यू
    • चंद्रपुरातील हृदयद्रावक घटना
    Lipi
    पैनगंगा नदी तरुण तरुणीचा बुडून मृत्यू

    निलेश झाडे, चंद्रपूर : पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या दोघांवर काळाने झडप घातली. पैनगंगा नदी पात्रात युवक-युवतीचा बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात येणाऱ्या भोयगाव येथे घडली. संध्या शिंदे (वय २०) आणि युगल नागपुरे (वय १९) अशी मृतकांची नावे आहेत. या घटनेनं जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपुरातील आदर्श फिजिकल ग्रुपचे संचालक आदर्श चिवंडे हे पोलीस भरतीसाठी सराव करण्यास प्रशिक्षण केंद्र चालवतात. त्यांनी संस्थेतील एकूण ३६ विद्यार्थ्यांना व्यायाम करण्यासाठी रविवारी धानोरा-भोयगाव मार्गावरील पैनगंगा नदीवर आणले होते. व्यायाम झाल्यानंतर काही प्रशिक्षणार्थी पैनगंगा नदीच्या पात्रात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे संध्या शिंदे आणि समीक्षा शेंडे हे दोघे खोल डोहात बुडाले. दोघींना वाचविण्यासाठी युगल नागापुरे या तरुणाने पाण्यात उडी मारली. मात्र, तो देखील पाण्यात बुडाला. समीक्षा शेंडे ही युवती कशीबशी बाहेर निघाली. पण, संध्या शिंदे आणि युगल नागापुरे यांचा बुडून मृत्यू झाला. उपस्थित तरुण, तरुणींनी मृतक संध्याचा मृतदेह बाहेर काढला. परंतु, युगलचा मृतदेह आढळून आला नाही. अंधार झाल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली. आज पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात येणार आहे.
    Today Top 10 Headlines in Marathi: २० हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो, देवाभाऊंकडून विश्वासघात, छगन भुजबळ यांचा पक्षातूनच ‘करेक्ट कार्यक्रम’ नेत्यांकडून कात्रजचा घाट; सकाळच्या दहा हेडलाईन्स

    आई -वडिलांचा आधार कायमचा हिरावला

    युगल पुणेश्वर नागपुरे हा गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या सोनापूर गावातील तरुण होता. वडिलांची आर्थिक स्थिती बेताची आहे. कोमल नावाची एक बहीण त्याला आहे. युगल हा एकुलता एक वंशाचा दिवा होता. पोलीस होण्याचं त्याचं स्वप्न होतं. आई-वडिलांचा एकुलता एक आधार हरवल्याने त्यांच्यावर मोठा आघात झाला आहे. युगलच्या जाण्याने सोनापूर गावात शोककळा पसरली आहे.

    ताबा सुटल्याने चिरडून महिलेचा मृत्यू

    दरम्यान, काही दिवसांपूर्वी शहरात एक भीषण घटना घडली होती. यात चंद्रपूर येथून बल्लारपूर मार्गाने भरधाव वेगात निघालेल्या कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने पादचारी महिलेला चिरडले. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, ट्रकचालक फरार झाला आहे. पोलिसांनी घटनास्ठळी पोहोचून सदर महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि फरार ट्रकचालकचा शोध सुरू आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed