महाराष्ट्राच्या परभणीमध्ये १० डिसेंबरच्या संध्याकाळी एका व्यक्तीने संविधानाच्या प्रतचं नुकसान केलं होतं. त्यानंतर ११ डिसेंबरला परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, काही वेळातच परभणी बंद आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्जही केला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. हा दलितांवरील हल्ल्याशी जोडून शेअर केले जात आहे. या व्हिडिओ मागचं तथ्य काय समजून घ्या.