BJP Convention In Shirdi: महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून पक्षाने पुढील महिन्यात १२ जानेवारीला शिर्डीत पक्षाचे प्रदेश अधिवेशन आयोजित केले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या अधिवेशनात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाईल. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी या अधिवेशनाची माहिती दिली. स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधत या दिवशी शिर्डीत भाजपने मोठा उपक्रम हाती घेतला आहे. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आधारित हे अधिवेशन असेल. त्यांच्या विचारांनुसार युवकांना प्रेरित करून भाजपकडे आकर्षित करण्यासाठी यावेळी नवीन अभियानाची सुरुवात होणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
नववर्ष, नाताळसाठी कोकण, गोव्याला जाण्याचं प्लॅनिंग करताय? ‘या’ मार्गावर धावणार स्पेशल ट्रेन्स, वाचा Timetable
शिर्डीत आयोजित अधिवेशनाला राज्यभरातून सुमारे १० हजार भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या अधिवेशनात विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.
‘एक निवडणूक’वर मोहोर; एकत्र निवडणुका घेण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
स्थानिक निवडणुका याचवर्षी?इतर मागासवर्गाचे आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्य संख्या, प्रभाग रचना यासंदर्भातील अधिकार राज्य सरकारचे की निवडणूक आयोगाचे या आणि इतर मुद्द्यांमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्या आहेत. यासंदर्भात पुढील महिन्यात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यानंतर या निवडणुकांचा मार्ग मोकळा होऊन त्या याचवर्षी होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भाजपने आतापासून तयारी चालवली आहे