Nana Patole Ramesh Chennithala : काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतेच हायकमांडला एक पत्र लिहिले असल्याची माहिती पुढे आली असून या पत्रात त्यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याचे कळते.
हायलाइट्स:
- काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नितला यांच्या राजीनाम्याचे वृत्त
- पदमुक्त होण्यासाठी प्रदेशाध्यक्ष पटोले यांचे हायकमांडला पत्र
साईभक्तांसाठी महत्त्वाची बातमी! २० डिसेंबरला साईबाबांचं समाधी मंदिर ‘या’ वेळेत दर्शनासाठी राहणार बंद
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पटोले यांनी हे पत्र लिहिले आहे. या पत्रात पटोले यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या चार वर्षांच्या कारकीर्दीचा लेखाजेखा मांडला असल्याचे कळते. त्यांच्या कारर्कीदीत लोकसभा निवडणुकांसह इतर निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळाले. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला म्हणावे तसे यश मिळाले नसल्याने त्याची जबाबदारी स्वीकारत पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पटोले यांचे हे पत्र दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले. त्यातच संध्याकाळी उशिरा महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नितला यांनीही पदाचा राजीनामा दिला असल्याचे वृत्त समोर आले. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
Sharad Pawar: पंतप्रधानांना साहित्य संमेलनाचे निमंत्रण; स्वागताध्यक्ष शरद पवार यांचे नरेंद्र मोदींना पत्र
१६ डिसेंबरला गटनेत्यांची निवड
विधानसभा निवडणुकीत पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा फटका बसल्याने आता विधिमंडळ पक्षनेते पदी कोणाची वर्णी लागते, यावरून चर्चेला उधाण आले आहे. याबाबत १६ डिसेंबरला निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती अखेर पक्षाकडून देण्यात आली आहे. नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष पदाला सोडचिठ्ठी देऊन या पदासाठी दावा करतील, अशी शक्यता पक्षातील सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे. माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली आहे.
‘एक निवडणूक’वर मोहोर; एकत्र निवडणुका घेण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
प्रदेशाध्यक्षपदी नवा चेहरा?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येत्या काळात राजीनामा दिल्यास त्यांच्या जागा तरुण नेतृत्त्वाला संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. यात माजी मंत्री अमित देशमुख, विश्वजीत कदम यांच्या नावाची चर्चा असल्याचे कळते.