• Sat. Dec 28th, 2024
    ‘मतमोजणीतील घोटाळा कोणाच्याही नजरेतून सुटत नाही,’ आव्हाडांनी निवडणूक आयोगाला पुन्हा फटकारले

    Jitendra Awhad Commented on EVM: ईव्हीएम मतमोजणीवरुन निवडणूक आयोग विरोधकांच्या निशाण्यावर आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी देखील निकाल हा मोठा घोटाळा असल्याचे सांगत काही प्रश्न उपस्थित केले.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    ठाणे : विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाप्रचंड बहुमत मिळाले आहे. असे असताना मात्र विरोधकांकडून निकालावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामध्येच ईव्हीएम मतमोजणीवरुन निवडणूक आयोग विरोधकांच्या निशाण्यावर आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी देखील निकाल हा मोठा घोटाळा असल्याचे सांगत काही प्रश्न उपस्थित केले. ‘महाराष्ट्रात मतमोजणीमध्ये झालेला घोटाळा कुठल्याही माणसाच्या नजरेतून सुटत नाही. ५ वाजेनंतर काही तासांतच १३ टक्के मतदान वाढले कसे? ते आयोगाने दाखवावे,’ असे आव्हाडांनी म्हटले आहे.

    जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘महाराष्ट्रात मतमोजणीमध्ये झालेला घोटाळा कोणाच्याही नजरेतून सुटत नाही. मी महाराष्ट्रातील उमेदवारांना आवाहन करेल की सगळ्यांनी मिळून कोर्टात जावे. आम्हाला अभ्यास करायला लावला आहे, तेव्हा आता सगळाच अभ्यास केला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये १४३ केंद्र आहेत ज्यात मतं वाढली आहेत लाखोंनी मतं वाढली आहेत ती कशी वाढली?’ असा प्रश्न उपस्थित करत या सगळ्या संशयास्पद प्रकरणावर पराभूत उमेदवारांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
    नाना पटोले टार्गेटवर…; विजयाचे श्रेय लाटणाऱ्यांकडेच पराभवाचीही जबाबदारी, स्वपक्षीय नेत्यांकडून मिळाला घरचा आहेर
    आव्हाड पुढे म्हणाले, ‘आम्ही निवडणुकीआधी आयोगाच्या नजरेत आणून दिलं होत की, काही मतदारसंघात मतदार कमी करत आहेत तर काही ठिकाणी वाढवले जात आहेत. निवडणूक आयोगाची कीव यावी की निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित घेता येत नाही. व्यवस्थित अभ्यास करून आम्ही सर्व पेपरवर आणलं आहे. शेजारी असणाऱ्या दोन मतदारसंघातील उमेदवारांचा परभव सारख्याच फरकाने होतो. ही कसली जादू आहे?’

    जितेंद्र आव्हाडांनी असेही नमूद केले की, ‘असं जर कोणी बोलत असेल की जितेंद्र आव्हाड आज का बोलतात, पण मी २०१४ पासून बोलत आहे. १७ अ फॉर्म याच्यावर केंद्रीय अध्यक्षाची सही असते, मग १७ सी फॉर्म आणि मतदानात तफावत येतेच कशी? महाराष्ट्रातल्या उमेदवारांना अवगत करण्यासाठी हे दिलं आहे. मी निवडून आल्यामुळे मला १७ अ मागता येत नाही, नाहीतर मीच गेलो असतो.’

    अमेरिकासारख्या राष्ट्रांनी ईव्हीएमवर शंका व्यक्त केली. अमेरिका सारखं राष्ट्रामध्ये ईव्हीएममध्ये घोटाळा होऊ शकतो तर निवडणूक अधिकारी ‘हो’ म्हणाले.
    देशाची लोकशाही काही अशीच आलेली नाही. मी स्वतः काही माहिती अधिकार टाकले आहेत. इलेक्शन कमिशनच्या मशीनचा बाहेरचा भाग फक्त भारतात बनतो बाकी सगळे भाग बाहेरुन येतात, यावर आक्षेप घेणारे सुब्रमण्यम स्वामी त्यांच्यामुळेच व्हिव्हीपॅट आला आहे, असेही आव्हाडांनी अधोरेखित केले आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed