Authored byसूरज सकुंडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम13 Dec 2024, 10:58 pm
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून तीन आठवडे होऊन गेले, तरी ईव्हीएमचा वाद काही थांबता थांबत नाही. दरम्यान ईव्हीएमच्या मुद्द्यावरून सत्ताधारी महायुतीकडून अनेकदा सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हेसुद्धा ईव्हीएमवरच निवडून आले आहेत, असं म्हणत आधी त्यांचा राजीनामा घ्या , अशी टीका केली जाते. दरम्यान सत्ताधाऱ्यांचं हे आव्हान रोहित पवारांनी स्वीकारलं आहे. परंतु रोहित पवारांनी एक अटही घातली आहे. नेमकं काय म्हणाले रोहित पवार? पाहुया….