बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची घटना समोर आलीय. त्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरलीये. अशातच शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांनी मस्साजोगला भेट देऊन देशमुख कुटुंबीयांचं सांत्वन केलं. यावेळी संतोष देशमुख यांच्या मुलीला अश्रू अनावर झाले. तर देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर ज्योती मेटे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.