राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवारांनी आमदारकीची शपथ घेतली. यावेळी संविधानाची प्रत हातात घेऊन रोहित पवारांनी शपथ घेतली. महाराष्ट्र आणि कर्जत जामखेडच्या मातीला साक्ष ठेवून त्यांनी शपथ घेतली. यावेळी जय महाराष्ट्र, जय संविधान, जय कर्जत जामखेडचा नाराही त्यांनी दिला.