• Mon. Dec 30th, 2024
    माळशिरसचा निकाल अनुकूल नाही! बॅलेट पेपरवरील मतदानासाठी गावाला बंदी का? कोणता कायदा? शरद पवार बरसले

    Sharad Pawar Commented on Markadwadi : राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मारकडवाडीतील मतदान आंदोलनातील कारवाईवरुन प्रशासनाला घेरले आहे. त्यांनी कारवाईविरोधात प्रशासनाला जाब विचारला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पुणे : राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मारकडवाडीतील मतदान आंदोलनातील कारवाईवरुन प्रशासनाला घेरले आहे. त्यांनी कारवाईविरोधात प्रशासनाला जाब विचारला आहे. ‘मारकडवाडी गावच्या लोकांनी एक पद्धत अवलंबली. जुन्या पद्धतीने मतदान करावं हे त्यांनी ठरवलं. पण बॅलेट पेपरवर त्यांना बंदी का? कोणता कायदा आहे,’ अशा शब्दांत पवारांनी खडसावले.

    शरद पवार म्हणाले, ‘मी उद्या मारकडवाडीत जात आहे. तेथील लोकांशी संवाद साधणार आहे. या ठिकाणचे दोन्ही उमेदवार पाहा. त्यांच्या सभा मी पाहिल्या. गेल्या ४० ते ५० वर्षापासून मी तेथे सभा करत आहे. यांच्या सभा पाहिल्यावर निकाल काय लागणार हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही, वातावरण अनुकूलच होतं. पण हा निकाल अनुकूल नाही. पण जोपर्यंत अधिकृत माहिती नाही तोपर्यंत बोलणार नाही.’
    Ajit Pawar : अजित पवार यांची ताकद वाढली पण आव्हान कायम, कौटुंबिक समझोता झाला तरच…
    राहुल गांधींच्या मारकडवाडी दौऱ्यावर देखील पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘राहुल गांधी येणार असल्याबाबत माझ्या वाचनात आलंय. पण मला नक्की माहित नाही. तर मी ईव्हीएमवर संशय व्यक्त केलेला नाही. माझ्याकडे याबद्दल ऑथेंटिक माहिती नाही. मी फक्त आकडेवारी सांगितली आहे.’ तर पुढे शरद पवारांनी आपल्या दौऱ्याबाबतही भाष्य केले आहे. ‘निवडणूक होऊन गेली होती. मारकडवाडी गावकऱ्यांनी् एक पद्धत अवलंबली. जुन्या पद्धतीने मतदान करण्याचं त्यांनी ठरवलं. बॅलेट पेपरवर त्यांना बंदी का? कोणता कायदा आहे. गावात १४४ कलम लावलं? त्याचं कारण काय. मला हे पाहून आश्चर्य वाटलं. म्हणून मी ठरवलं तिकडे जाऊनच येऊ. लोकांचं मत जाणून घेऊ आणि अधिकाऱ्यांशी बोलू. जयंत पाटील आणि इतर पदाधिकारी नेते माझ्यासोबत येणार आहेत.

    दरम्यान शरद पवारांनी आगामी निवडणुकांतील मविआबाबतही भूमिका स्पष्ट केली. ‘आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत एकत्र असणार आहोत. निवडणुकीत अप आणि डाऊन येत असतो. त्यामुळे निराश व्हायचं नसतं. १४ निवडणुका पाहिल्या. कधी पराभव पाहिला नाही, या निवडणुकीत पराभव झाला. पण तरीही निराश व्हायचं नाही, लोकांमध्ये जावं लागतं, लोकांमध्ये गेलंच पाहिजे.’ असे शरद पवार म्हणाले.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed