• Mon. Dec 30th, 2024

    कुर्ला – बीकेसी मार्गावर पॉड टॅक्सी कधी सुरू होणार? जाणून घ्या कसा असेल मार्ग आणि किती असेल भाडं?

    कुर्ला – बीकेसी मार्गावर पॉड टॅक्सी कधी सुरू होणार? जाणून घ्या कसा असेल मार्ग आणि किती असेल भाडं?

    Pod Taxi Kurla BKC : मुंबईतील कुर्ला – बीकेसी या मार्गावर पॉड टॅक्सी चालवण्याची योजना असून या योजनेची अवस्था मोनो रेलसारखी होऊ शकते अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. किती असेल पॉड टॅक्सीचं भाडं आणि कसा असेल मार्ग?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : एमएमआरडीएने मुंबईतील सर्वात महागड्या प्रवासी भाडे प्रकल्पाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत कुर्ला ते बीकेसी हा पॉड टॅक्सी प्रकल्प सायन रेल्वे स्थानकाशी जोडण्याचा विचार केला जात आहे. त्याचवेळी दुसरीकडे मुंबईत उभारण्यात येणाऱ्या देशातील पहिल्या पॉड टॅक्सी प्रकल्पावर वाहतूक तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

    पॉड टॅक्सीसाठी २१ रुपये प्रति किमी असं भाडं ठेवलं जाऊ शकतं. या प्रस्तावित भाड्यावरही तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. जगातील केवळ निवडक कंपनीकडून पॉड टॅक्सीचा पुरवठा होतो, त्यामुळे पॉड टॅक्सीची अवस्था मोनो रेल्वेसारखी होऊ शकते अशी शंका तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
    देवेंद्र फडणवीसांनी केलेलं मॉडेलिंग शूट, थेट दिल्लीतून बोलावणं आलेलं… काय आहे या फोटोमागची स्टोरी

    मोनो रेलप्रमाणे पॉड टॅक्सी फेल होण्याचा दावा

    ट्रॅफिक एक्सपर्ट अशोक दातार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉड टॅक्सीसारख्या महागड्या प्रोजेक्टऐवजी एमएमआरडीएने बस सेवेत सुधारणा कराव्यात. पॉड टॅक्सीने प्रवास करण्यासाठी प्रवाशाला कुर्ला ते बीकेसी या प्रवासासाठी जवळपास १५० रुपये खर्च करावे लागतील. पण बस सेवेमुळे कुर्ला ते बीकेसी हाच प्रवास केवळ ५ ते १० रुपयांत प्रवाशांना पूर्ण करता येत आहे. तर रिक्षाने हाच प्रवास २० ते ३० रुपयात करता येतो. अशात १५० रुपये खर्च करुन एखादा प्रवासी या मार्गावरुन प्रवास करेल का? ही विचार करण्यासाठी बाब आहे, असं ते म्हणाले.

    त्यामुळे अशा महागड्या प्रोजेक्टऐवजी एमएमआरडीएने प्रत्येक मेट्रो स्टेशन बसशी कनेक्ट करण्याचा विचार करावा. तसंच या मार्गावर बस सेवाही वाढवावी, असा सल्लाही ट्रॅफिक एक्सपर्ट अशोक दातार यांनी दिला आहे.
    नरिमन पॉईंट ते विरार दीड तासांचा प्रवास ३५ मिनिटांत होणार, कसा असेल मार्ग? कधी सुरू होणार?
    ट्रान्सपोर्ट एक्सपर्ट एवी शेनॉय यांनी पॉड टॅक्सीबाबत बोलताना सांगितलं, की जगातील केवळ काही कंपन्यांनी पॉड टॅक्सींच्या पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. शेनॉय यांच्या म्हणण्यानुसार, मोनोरेलच्या सुरुवातीला एमएमआरडीएला मोनोरेलच्या पुरवठा आणि देखभालीसाठी परदेशी कंपनीवर अवलंबून राहावं लागलं आहे. कंपनीने पुरवठा बंद केल्याने मोनो रेल सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. कंपनीने पॉड टॅक्सींचा पुरवठाही बंद केला तर हा प्रकल्प एमएमआरडीएसाठी दुसरा पांढरा हत्ती ठरेल, असं ते म्हणाले. तसंच हा प्रोजेक्ट यशस्वी होण्यासाठी भाडं कमी ठेवणं गरजेचं असल्याचं ट्रान्सपोर्ट एक्सपर्ट विवेक पै यांनी सांगितलं.
    मुंबईतील पहिल्या अंडरग्राऊंड मेट्रोचा प्रवास होणार महागडा, कुठून-कुठपर्यंत किती असणार भाडं? कसा आहे मार्ग?

    काय आहे पॉड टॅक्सी प्रोजेक्ट?

    – कुर्ला ते बीकेसी दरम्यान ८.८० किमी लांबीच्या मार्गावर पॉड टॅक्सी धावेल.
    – ६ प्रवास या टॅक्सीने प्रवास करतील, तर एकूण ३८ स्टेशन असतील.
    – ४० किमी ताशी वेगाने धावण्याची या टॅक्सीची क्षमता आहे.
    – ही पॉड टॅक्सी कुर्ला रेल्वे स्थानकापासून मिठी नदी ओलांडून बीकेसीच्या जी ब्लॉक, ई ब्लॉकच्या प्रमुख संस्थांजवळून पुढे कलानगर पश्चिम रेल्वेच्या वांद्रे रेल्वे स्थानकावर पोहोचेल.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed