Aaditya Thackeray hand shake with Devendra Fadnavis :सभागृहाच्या पायऱ्यांवर आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अचानक भेट झाली. यावेळी दोघांनी हस्तांदोलन केले
विरोधी पक्षातील नेत्यांचा बहिष्कार
नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीला सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी यावेळी शपथ घेतली. परंतु ईव्हीएमचा निषेध नोंदवत विरोधी पक्षातील नेत्यांनी आमदारकीची शपथ आज न घेण्याचा निर्णय घेतला. विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक विधान परिषद नेते अंबादास दानवे यांच्या दालनात झाली. आमदारांच्या शपथविधीचा कार्यक्रम रविवारीही सुरु राहणार आहे. विरोधी पक्षातील नेते आजऐवजी उद्या घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अचानक भेट झाली. यावेळी दोघांनी हस्तांदोलन करत बातचित केली. निघताना पुन्हा एकदा दोघांनी शेकहँड करत निरोप घेतला.
Eknath Shinde : खरंच नाराज होते का एकनाथ शिंदे? फडणवीस म्हणाले, ते स्वभावाने भावूक आहेत, आमचे अजितदादा मात्र…
ठाकरे-फडणवीसांचा फोन
दुसरीकडे, मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याच्या आदल्या दिवशी, म्हणजेच चार डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. यावेळी ‘जुन्या मित्रां’मध्ये गप्पा झाल्या होत्या. ठाकरेंनी आपल्याला तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिल्याचं फडणवीसांनी सांगितलं होतं.
Ajit Pawar : भाजपला पाठिंबा द्या, उपमुख्यमंत्रिपद घ्या, १००० कोटींची संपत्ती पुन्हा खिशात; अजितदादांवर दमानियांचा घणाघाती आरोप
“उद्धव ठाकरेंनाही शपथविधी सोहळ्याला आमंत्रित केलं होतं. आमच्या चांगल्या गप्पा झाल्या. ठाकरेंनी माझं अभिनंदन केलं आणि माझ्या सुदृढ आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या” अशी माहिती फडणवीसांनी दिली होती.