Nana Patole On Ballot Paper: मतपत्रिकेवर मतदान घेतले जाणार असेल तर आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढण्यास तयार आहे’, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली.
पटोले शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. ‘अनेक गावांमध्ये प्रत्यक्षात झालेले मतदान आणि ईव्हीएममधील मते यामध्ये तफावत आहे. इतकेच नव्हे, तर वाढलेले मतदान हेसुद्धा संशयास्पद आहे. सायंकाळी ५ ते रात्री ११.३० वाजता मोठ्या प्रमाणात मतदान झाले. रात्री मतदारांच्या रांगा कुठे होत्या, ते आयोगाने सांगायला हवे. मला राजीनामा देऊन निवडणूक लढण्याचे आव्हान देणाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडून मतपत्रिकेवर मतदान घेण्याबाबतचे पत्र आणावे’, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
आता मंत्रिपदे, खात्यांवर खल; शिवसेनेला १०, तर ‘राष्ट्रवादी’ला सात कॅबिनेट मंत्रिपदे?
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्यांना शुभेच्छा आहेत. महाराष्ट्र पुढे जावा. येथील युवकांना रोजगार मिळायला हवा. आता आमचे मित्र मुख्यमंत्री झाले आहेत. राज्यात कंत्राटी भरती केली जाणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. आता त्यांनी कंत्राटी भरती करू नये. राज्यात दोन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. ती भरून युवकांना न्याय द्यावा. कापूस, सोयाबीनाला भाव मिळेल, अशी अपेक्षा त्यांच्याकडून आहे, असेही पटोले म्हणाले.
पालिका निवडणुका लवकरच! मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत, राज ठाकरेंना सोबत घेण्याचा विचार
‘शपथविधीचे निमंत्रणच नव्हते’
महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित राहण्याबद्दल विचारले असता नाना पटोले म्हणाले, ‘मला शपथविधीचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. ते मिळाले असते तर शपथविधीला गेलो असतो. महायुतीच्या नेत्यांनी कोणा-कोणाला निमंत्रण दिले, माहिती नाही. मला तरी ते नव्हते.’