Cabinet Expansion: विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर अखेर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी काल आझाद मैदानात संपन्न झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर एकनाथ शिंदे, अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
शिंदे मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळातील सदस्यसंख्या २८ इतकी होती. त्यात शिवसेनेचे ९ जण होते. यातील सगळेच पुन्हा मंत्रिपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. तर शिंदेंना बंडात साथ दिलेल्या आमदारांनाही मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेला १० मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. वाटाघाटीत शिवसेना १२ ते १३ मंत्रिपदासांठी आग्रही आहे.
Cabinet Expansion: ‘ते’ पुन्हा मंत्रिपदी नकोत! भाजपकडून सेनेला स्पष्ट सूचना; तीन जणांचा पत्ता कट होणार?
शिंदेंनी केलेल्या बंडात सेनेच्या ४० आमदारांनी साथ दिली. तर विधानसभा निवडणुकीत सेनेचे एकूण ५७ उमेदवार विजयी झाले. यंदा मंत्रिपदं देताना शिंदे तीन कठोर निकष लावणार आहेत. पक्ष वाढवण्यात योगदान देणाऱ्यांचा विचार मंत्रिपदं देताना केला जाईल. निवडणूक प्रचारात आमदारानं किती साथ दिली, ही बाब मंत्रिपद देताना विचारात घेतली जाईल. तिसरा महत्त्वाचा निकष म्हणजे केवळ ज्येष्ठ आहे म्हणून मंत्रिपदं दिलं जाणार नाही.
फक्त ज्येष्ठतेच्या मुद्द्यावर मंत्रिपद दिलं जाणार नसल्यानं शिवसेनेतील बड्या नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. या निकषाचा धक्का अनेकांना बसू शकतो. त्यामुळे भल्याभल्या नेत्यांनी याचा धसका घेतला आहे. गेल्या मंत्रिमंडळात शिवसेनेकडून गुलाबराव पाटील, संजय राठोड, उदय सामंत, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभुराज देसाई, दादा भुसे यांची वर्णी लागली होती.
Eknath Shinde: शिवसेनेकडून ‘युती पॅटर्न’ची मागणी, तर भाजप २०१४ रिपीट करण्याच्या तयारीत; कोणाचा गेम होणार?
‘ते’ नेते मंत्रिमंडळात नकोत, भाजपकडून सेनेला सूचना
वादग्रस्त चेहरे, भ्रष्टाचाराचे आरोप असणारे आमदार मंत्रिमंडळात नकोत, अशी सूचना भाजपकडून शिवसेनेला करण्यात आलेली आहे. अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, संजय राठोड यांच्यासारखी नेतेमंडळींची शिफारस मंत्रिपदांसाठी करु नका, असं भाजपकडून सांगण्यात आलं आहे. भाजपची सूचना सेनेला आवडलेली नाही. आमचे मंत्री आता भाजप ठरवणार का, असा सवाल सेनेचे नेते विचारत आहेत.