• Sun. Sep 6th, 2026

कालिदास कोळंबकर यांना विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Dec 6, 2024
कालिदास कोळंबकर यांना विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ – महासंवाद




मुंबई, दि. ६: विधानसभेचे जेष्ठ सदस्य कालिदास सुलोचना निळकंठ कोळंबकर यांना आज विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ देण्यात आली. राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी कोळंबकर यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विधानमंडळ सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने तर सांगता राष्ट्रगीताने झाली.

०००







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed