मुंबई, दि. ६ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी संविधानाच्या अनुच्छेद 174, खंड (1) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र विधानसभेची बैठक विधानभवन, मुंबई येथे उद्या शनिवार, दि.७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. आयोजित केल्याची माहिती महाराष्ट्र विधानसभेचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे यांनी दिली आहे.
याचबरोबर महाराष्ट्र विधानपरिषदेची बैठक सोमवार, दि. ९ डिसेंबर, २०२४ रोजी सायंकाळी ४ वा. आयोजित करण्यात आली असल्याचेही विधानमंडळ सचिवालयामार्फत कळविण्यात आले आहे.
०००