• Sat. Dec 28th, 2024
    शपथ घेताना आपल्या नावाआधी आईचं नाव, कारण काय? सांगलीत माजी उपसरपंचाची गळा चिरुन हत्या

    Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या लेटेस्ट मराठी बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’वर, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर

    १. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरूच राहणार असून, निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे बहिणींना २१०० रुपये दिले जातील. मात्र, त्याचा विचार आम्ही आगामी अर्थसंकल्पात करू,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत अद्वितीय आणि अभूतपूर्व यश मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’ना २,१०० रुपयांच्या मदतीसाठी एप्रिल २०२५पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. बातमी वाचा सविस्तर…
    २. पाच वर्षांपूर्वी ‘मी पुन्हा येईन’ असा निर्धार करणारे देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस…’ अशी सुरुवात करीत पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मात्र, तिघांनी शपथ घेतली, पण या शपथविधीवेळी एक गोष्ट कुणाच्या लक्षात आली का? मुख्यमंत्र्यांनी शपथ घेण्याआधी आपल्या नावाआधी आईचंही नाव जोडलं आणि त्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी देखील असंच केलंय. पण हे नेमकं का घडलं? ते आपण जाणून घेऊया. बातमी वाचा सविस्तर…

    ३. राज्यात २३२ जागांसह मोठे बहुमत मिळविणाऱ्या महायुती सरकारचा शपथविधी गुरुवारी आझाद मैदानात पार पडला. महाराष्ट्राच्या १५व्या विधानसभेचे ३१वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. गेले काही दिवस उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास फारसे उत्सुक नसलेले माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनीही अजित पवार यांच्यासह उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या शपथविधी सोहळ्याद्वारे महायुतीने शक्तिप्रदर्शन केले.

    ४. बॉलिवूड अभिनेता सलमान खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सलमान खानची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे सलमान मोठ्या संपत्तीचा मालक आहे. सलमानने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिली आहेत. काही दिवसांपूर्वीच सलमान खानचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातून शहनाज गिल हिने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. सलमान खानला बॉलिवूड दबंग खान देखील म्हटले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळताना दिसत आहेत.

    ५. राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले असून महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. संगमनेर येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा घेतला या कार्यक्रमासाठी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार तथा बाळासाहेबांचे भाचे सत्यजीत तांबे मंचावर उपस्थित होते आणि आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे सत्यजीत तांबे यांनी एक्स हॅण्डलवर पोस्ट करत कौतुक केल्याने सत्यजीत तांबेंच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? असाच प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहेत.

    ६. विधानसभा निवडणुकीआधी अनेक उमेदवारांवर हल्ला झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्याही गाडीवर दगडफेक झाली होती. यामध्ये देशमुख जबर जखमीज झाले होते आणि त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. राज्यात अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या होत्या. अशातच एका अपक्ष उमेदवारावरील हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. अपक्ष उमेदावाराने सहानुभूतीसाठी घरावर गोळीबार करून घेतला होता.

    ७. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्यासारख्या गरीब शेतकऱ्याच्या घरात मुक्कामी राहिले. आम्ही जी मीठ-भाकर खातो तीच त्यांनी खाली बसून खाल्ली. रात्री आमच्या घरीच झोपी गेले. सकाळी नाश्ता करून परत गेले. आज इतकी वर्षे झाली पण ती आठवण हृदयात कोरली गेली आहे. आता परत मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस यांनी आमच्या घरी मुक्कामी यावे, आमच्यासोबत मीठ-भाकर खावी, अशी शब्दांत पिंपरीबुटी येथील शेतकरी विष्णू ढुमणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

    ८. भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे रंगला ज्यात भारताने सहज विजय मिळवला. दुसरा सामना हा ॲडलेडमध्ये आज रंगणार आहे. आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल दिसू शकतात. आजच्या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करताना दिसणार आहे. आजचा सामना दोन खेळाडूंसाठी स्पेशल असणार आहे कारण त्यांचा आज वाढदिवस आहे.

    ९. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) चलनविषयक समितीचे धोरण आज जाहीर होणार आहेत आणि त्यापूर्वी शेअर बाजारातील गुंतवणूकदार सावध पवित्रा अवलंबताना दिसत आहे. आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी, शुक्रवारी, देशांतर्गत बाजाराने शंभरपेक्षा अधिक अंकांच्या वाढीसह सुरुवात केली असून निफ्टीमध्ये सपाट ट्रेडिंग होताना दिसत आहे.

    १०. पुणे जिल्ह्यामधील भोर तालुक्यामध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृतदेह झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. परीक्षेसाठी गेलेला मुलगा घरी माघारी न परतल्याने घरच्यांनी महाविद्यालयात विचारल्यावर तो आलाच नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं. त्यानंतर घरचेही घाबरून गेले त्यांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. मात्र काहीच माहिती समोर न आल्याने ते अस्वस्थ झाले. कॉलेजमध्ये कोणाचा तरी मृतदेह झाडावर लटकवलेल्या अवस्थेत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकली. बातमी वाचा सविस्तर…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed