Pune Yerawada Chief Minister Provides Help Patient: कुऱ्हाडे या रुग्णावर बोन मॅरो प्रत्यारोपणाचे उपचार करण्यात येणार आहे. या उपचारांसाठीचा खर्च ३० लाख रुपये आहे. त्यापैकी पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून मंजूर करण्यात आले आहेत.
हायलाइट्स:
- शपथ घेतल्यानंतर पहिल्याच फाईलवर सही
- येरवड्यातील ‘त्या’ रुग्णाला मुख्यमंत्र्यांची मोठी मदत
- पाच लाख रुपये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत
Devendra Fadnavis: राज्यात तिसरे ‘देवेंद्र’पर्व; लाडक्या बहिणींच्या २१०० रुपयांबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य
कुऱ्हाडे या रुग्णावर बोन मॅरो प्रत्यारोपणाचे उपचार करण्यात येणार आहे. या उपचारांसाठीचा खर्च ३० लाख रुपये आहे. त्यापैकी पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित २५ लाख रुपये धर्मादाय संस्थांकडून मिळालेल्या मदतीतून उभे करण्यात येणार आहेत. या रुग्णावर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याकरिता कुऱ्हाडे यांच्या पत्नीने वैद्यकीय मदतीसाठी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिली स्वाक्षरी केली. मुख्यमंत्र्यांनी गरजू रुग्णाच्या आर्थिक मदतीच्या फाइलवर स्वाक्षरी करून कामाचा श्रीगणेशा केला. त्यामुळे आता कुऱ्हाडे यांच्यावर उपचाराचा मार्ग मोकळा झाला आहे.
विधानसभेतील नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यासाठी येत्या शनिवार ७ आणि रविवार ८ डिसेंबरला मुंबईत विशेष अधिवेशन आयोजित करण्याचा निर्णय नूतन मंत्रिमंडळाने घेतला आहे. शपथविधीसाठी तारखांच्या शिफारस राज्यपालांना करण्यात आली आहे. त्यानुसार दोन दिवस नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होईल, तर अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्ष निवड होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली, तर तिसऱ्याच दिवशी राज्यपालांचे अभिभाषण होईल, असेही फडणवीस म्हणाले.