• Sat. Dec 28th, 2024

    कोई नहीं है टक्कर में! ‘अशी’ कामगिरी करणारे फडणवीस पहिलेच; देवाभाऊंच्या नावावर अनोखा विक्रम

    कोई नहीं है टक्कर में! ‘अशी’ कामगिरी करणारे फडणवीस पहिलेच; देवाभाऊंच्या नावावर अनोखा विक्रम

    Devendra Fadnavis: मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना… मैं समंदर हूं लौटकर वापस आऊंगा… भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये विधानसभेत भाषण केलं. त्यातल्या या ओळी सगळ्यांच्या लक्षात राहिल्या. वि

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना… मैं समंदर हूं लौटकर वापस आऊंगा… भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये विधानसभेत भाषण केलं. त्यातल्या या ओळी सगळ्यांच्या लक्षात राहिल्या. विधानसभा निवडणुकीत जनादेश मिळून, सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला विरोधी बाकांवर बसावं लागलं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरुन युती तोडली. शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्यावेळी फडणवीस यांनी त्यांच्या मनोभावना बोलून विधानसभेत बोलून दाखवल्या.

    मागील ५ वर्षांत राज्यात अभूतपूर्व घडामोडी घडल्या. समंदर हूं लौटकर वापस आऊंगा, असं म्हणणारे फडणवीस आधी विरोधी पक्षनेते, मग उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर आता ते मुख्यमंत्रिपद म्हणून ‘पुन्हा आले’ आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून देवेंद्र फडणवीस यांचा मुक्काम सागर बंगल्यावर होता. पण समंदर लौट वापस आल्यानं त्यांचा मुक्काम वर्षावर असेल. मागील ५ वर्षे फडणवीस यांच्यासाठी कसोटीची ठरली. पण त्यांनी अतिशय धीरोदात्तपणे अनेक संकटांना तोंड देत पुनरागमन केलं.
    Eknath Shinde: आधी ताणलं, मग सोडलं! शिंदे अखेर सत्तेत, ३ कारणं महत्त्वाची, भाईंनी संभाव्य धोका टाळला
    अशी कामगिरी करणारे पहिलेच; फडणवीसांच्या नावावर विक्रम
    देवेंद्र फडणवीस यांच्या आधी राज्यानं नऊ उपमुख्यमंत्री पाहिले. फडणवीस दहावे उपमुख्यमंत्री ठरले. उपमुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतर कोणत्याही नेत्याला मुख्यमंत्री होता आलेलं नाही. ती कामगिरी फडणवीसांनी करुन दाखवलेली आहे. त्यामुळे फडणवीसांच्या नावावर अनोखा विक्रम जमा झालेला आहे. ३० जून २०२२ ते ५ डिसेंबर २०२४ या कालावधीत फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं.
    Eknath Shinde: इतिहासाची अशीही पुनरावृत्ती! तेव्हा ठाकरे, आता शिंदे; पक्षप्रमुखांसमोर पेच, कारण तेच
    आतापर्यंत कोणी कोणी भूषवलं उपमुख्यमंत्रिपद?
    काँग्रेसचे नाशिकराव तिरपुडे, एस काँग्रेसचे सुंदरराव सोळंके, काँग्रेसचे रामराव आदिक, भाजपचे गोपीनाथ मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, आर आर पाटील, अजित पवार यांनी आतापर्यंत उपमुख्यमंत्रिपदी काम केलं आहे. पैकी भुजबळ तीनदा मुख्यमंत्री राहिले आहेत. तर अजित पवारांनी आज सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यातील एकाही नेत्याला नंतर मुख्यमंत्री होता आलेलं नाही.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed