• Sat. Dec 28th, 2024
    पुन्हा एकदा काकांचा पक्ष फोडणार अजित पवार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

    Ajit Pawar News : येत्या काही दिवसांत राज्यात मोठी राजकीय घडामोड होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शरद पवार गटातील काही खासदार आणि आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात, अशी चर्चा आहे.

    पुन्हा एकदा काकांचा पक्ष फोडणार अजित पवार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

    मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर आज ५ डिसेंबर रोजी महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. राज्याचे २१वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार सहाव्यांदा शपथ घेतली. याचदरम्यान अजित पवार पुन्हा एकदा शरद पवारांचा पक्ष फोडणार असल्याचं चर्चा आहेत.

    काय आहे नेमकं प्रकरण?

    सहाव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री होणारे अजित पवार पुन्हा एकदा काका शरद पवार यांचा पक्ष फोडू शकतात, अशी चर्चा आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने याची संपूर्ण जबाबदारी एका महिला नेत्याकडे दिल्याचा दावा केला जात आहे.
    देवेंद्र फडणवीसांनी केलेलं मॉडेलिंग शूट, थेट दिल्लीतून बोलावणं आलेलं… काय आहे या फोटोमागची स्टोरी
    विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या मोठ्या यशानंतर शरद पवार गटातील अनेक आमदारांनी त्यांची भेट घेतली असल्याचं बोललं जात आहे. अजित पवार शरद पवार गटातील आमदारांऐवजी काही खासदार आपल्या पक्षात घेऊन आपली ताकद वाढवू शकतात, असा दावा केला जात आहे. अजित पवारांचा नुकताच झालेला दिल्ली दौरा याच्याशी जोडला जात आहे. असं झाल्यास मात्र केंद्रातील एनडीए सरकारची ताकद अधिक वाढेल. सध्या लोकसभेत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एक खासदार आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आठ खासदार आहेत. यामध्ये सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे.
    शिंदेंनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडल्यानंतर फडणवीसांनीचे मोठे वक्तव्य; लोकांच्या मनातील किंतू परंतू…
    अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर शरद पवारांचे काही खासदार अजित पवारांसोबत जाऊ शकतात, ते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात, अशी चर्चा आहे. अजित पवार सहाव्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं समोर आल्यानंतर ही चर्चा सुरू झाली आहे.

    पुन्हा एकदा काकांचा पक्ष फोडणार अजित पवार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

    भिवंडीचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सागर बंगल्यावर फडणवीसांसोबत झालेल्या भेटीने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आलं आहे. फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आपण फक्त शरद पवार यांच्यासोबत आहोत, असं म्हात्रे त्यांनी स्पष्ट केलं होतं, मात्र काहीतरी घडण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed