Solapur Rajendra Raut News : जरांगेना भिडणाऱ्या माजी आमदाराच्या चिंतन मेळाव्यात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. विधानसभेतील पराभवानंतर त्यांनी मी वाघासारखा खंबीर आहे, घाबरू नका, असं म्हणतकार्यकर्त्यांना धीर दिला.
शिंदेंच्या शिलेदाराचा विधानसभेत निसटता पराभव, जरांगेना भिडणारा माजी आमदार म्हणतो – मी वाघासारखा खंबीर
विधानसभा निवडणुकीआधी बार्शी तालुका राज्यात प्रसिद्धीझोतात आला होता. माजी आमदार राजेंद्र राऊत आणि जरांगे पाटील यांच्यात कलगीतुरा रंगला होता. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले राजेंद्र राऊत भाजप सोबत सत्तेत गेले होते. पण २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र राजेंद्र राऊत यांचा निसटता पराभव झाला आहे.
माझी तब्येत बरी आहे, मी गावाला यायचं नाही का? CM पदाबाबत शिंदे म्हणाले- मुख्यमंत्री व्हावं अशी…
बार्शीत ठाकरे सेनेची मशाल पेटली –
मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून बार्शी तालुक्याला ओळखले जाते. बार्शी तालुक्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मशाल पेटली आहे. या विधानसभेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा निसटता पराभव झाला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार दिलीप सोपल यांना १ लाख २२ हजार ६९४ मतं मिळाली. तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना १ लाख १६ हजार २२२ मतं मिळाली. राजेंद्र राऊत यांचा फक्त ६ हजार ४७२ मतांनी पराभव झाला.
‘युवासेना एकसाथ, पालिका निवडणुकांमध्येही एकनाथ’, ठाण्यात युवासेनेची कोर कमिटीची बैठक, ठराव मंजूर
शिंदेंच्या शिलेदाराचा विधानसभेत निसटता पराभव, जरांगेना भिडणारा माजी आमदार म्हणतो – मी वाघासारखा खंबीर
मी वाघासारखा खंबीर आहे – राजेंद्र राऊत
बार्शी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार राजेंद्र राऊत यांचा मोठा चाहता वर्ग आहे. निवडणुकीतील पराभवानंतर कार्यकर्त्यांत नाराजी पसरली होती. त्यानंतर राजेंद्र राऊत यांनी बार्शी तालुक्यात कार्यकर्त्यांचा चिंतन मेळावा घेतला. एका पराभवाने एवढे नाराज होऊ नका, वाघासारखा मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा धीर त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. माजी आमदार राजेंद्र राऊत यांना ऐकण्यासाठी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट), आरपीआय (आठवले गट) पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.