Authored byमानसी देवकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम1 Dec 2024, 12:21 pm
फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावाने राज्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यात चंद्रपूर जिल्ह्यात काल शनिवारपासून ढगाळ वातावरण असून काही भागात रिपरीप पाऊस पडल्याने धानाचे पूंजने वाचवण्यासाठी बळीराजाची धावाधाव झाली होती. सद्या शेतात कापूस, तूर, हरभरा अशी पिकं आहेत. ढगाळ वातावरणामूळे तूर पिकावर संकट ओढवलंय. तूरीला फुलोरा आला आहे. मात्र पावसामुळे हा फुलोरा गळण्याचा धोका उदभवला असून अळीचा धोकाही वाढला आहे. दुसरीकडे मोठा पाऊस झाला तर कापूस काढण्याचा धोका निर्माण झाला आहे. एकीकडे कापूस वेचणीसाठी मजूर मिळेना अशी स्थिती आहे, तर दुसरीकडे अस्मानी संकट. या दोन्ही संकटाचा सामना करताना बळीराजाचा हतबल झाला आहे.