• Fri. Apr 25th, 2025 1:21:02 AM

    राणा दाम्पत्याची औकात नाही, बच्चू भाऊंचा संताप, गोड वाटतंय का? नवनीत राणांचा ‘कडू’ टोला

    राणा दाम्पत्याची औकात नाही, बच्चू भाऊंचा संताप, गोड वाटतंय का? नवनीत राणांचा ‘कडू’ टोला

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 28 Nov 2024, 5:34 pm

    Navneet Rana : मी माजी सैनिकाची मुलगी आहे म्हणून माझी औकात काढतात. सैनिकाच्या मुलीची औकात काढणाऱ्यांना जनतेने दाखवून दिलं आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई :अचलपूर विधानसभा मतदारसंघातून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा पराभव झाला. या पराभवावर स्वतः बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या पराभवाचं श्रेय राणा दाम्पत्याने घेऊ नये, संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र बदललं आहे. महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं व मी पडलो असतो तर राणांना श्रेय दिलं असतं असा टोला बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला लगावला. श्रेय घेण्यासाठी हपापलेले लोक आहेत हे, राणा दाम्पत्याची औकात नाहीये आहे आम्हाला पाडण्याची. कोणताही मतदारसंघ निवडा तुम्ही बिगर पार्टीचे व मी बिगर पार्टीचा” असं थेट आव्हान बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला दिलं.

    दरम्यान, विधानसभेत मिळालेल्या यशानंतर नवनीत राणा या देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा देण्यासाठी मुंबईत आल्या असताना पत्रकारांनी, बच्चू कडूंनी केलेल्या अपमानाबद्दल विचारणा केली. यावर प्रतिक्रीया देत, “माझी औकात काढणाऱ्यांना जनतेने त्यांची औकात दाखवून दिली. हे माझ्या एकटीचे श्रेय नाही. माझ्या जनतेने बदला घेतला. जनता जनार्दन दुसऱ्याची औकात काढणाऱ्यांना त्यांची औकात दाखवून देते. मी तर वयाने, अनुभावाने लहान आहे. मी माजी सैनिकाची मुलगी आहे म्हणून माझी औकाद काढतात. सैनिकाच्या मुलीची औकात काढणाऱ्यांना जनतेने दाखवून दिलं आहे. दादा आता कसं वाटतंय? गोड गोड वाटतंय?” अशा मिश्कील शब्दांत नवनीत राणांनी बच्चू कडूंवर पलटवार केला.
    तसेच संजय राऊत यांनी त्यांचे कौतुक केल्याचे त्यांना समजताच,”अरे देवा कोणी कौतुक केले संजय राऊतनी?मैंने सुना है समय देख के बहुत लोग बदलते है पर ऐसे लोगो के सुर भी बदलते है ये मैंने पहेली बार ही सुना है. प्रभू राम जसे भाजपचे एकट्याचे नाहीत, तसे बाळासाहेब एका कुटुंबाचे नाही ते संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत.आम्ही महायुती सरकार मध्ये आहोत. आम्ही सर्व मिळून लढणार” असेही त्या म्हणाल्या.
    मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस विराजमान होणार असे मला वाटत आहे.असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed