Thane City Vidhan Sabha Election BJP Candidate : ठाणे शहर मतदारसंघात भाजप आमदाराने हॅट्ट्रिक करत यंदाच्या विधानसभेत विजय मिळवला. आता त्यांना मंत्रिपद देण्याची मागणी होत आहे.
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदासाठी ठाण्यात देवाला साकडे, मंदिरांमध्ये महिलांच्या महाआरत्या, दर्ग्यातही सामूहिक प्रार्थना
कोकण पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर आमदारकी भूषविल्यानंतर संजय केळकर यांनी ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात हॅट्रिक साधली. गेल्या तीस वर्षांपासून राज्यात भाजप-शिवसेना युती असूनही, ठाणे शहराचा महापौर, भाजपच्या नशिबी नव्हता; मात्र, संजय केळकर यांना मंत्रिपद मिळाल्यास, महापालिकेवर भाजपाचा महापौर बसेल, अशी प्रतिक्रिया ही मागणी करणाऱ्या भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश गाडे यांनी दिली.
केळकर यांना मंत्रिपद मिळाल्यास, ठाणे शहराचा विकास, मुलभूत सुखसोयी आणि नागरी समस्या सुटतील, त्याचबरोबर भविष्यातील खरीखुरी ‘स्मार्टसिटी’ म्हणून नावारुपाला येण्यासाठी, संजय केळकर यांना ठाण्यातून मंत्रिपद मिळाले पाहिजे, असे गाडे यांनी या मागणीच्या पत्रात नमूद केले आहे.
पराभव नसून हा विश्वासघात आहे! माजी खासदारांना मंत्रीपदासाठी दबाव तंत्राचा वापर; पाहा काय केले
स्वाक्षरी मोहीम राबवणार
संजय केळकर संघटनेतील ज्येष्ठ नेते असून त्यांनी निस्वार्थपणे पक्षाची सेवा केली आहे. त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदाच्या मागणीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांची स्वाक्षरी मोहीम राबविणार असल्याचे राजेश गाडे यांनी सांगितले.
केळकर संयमी नेतृत्व
संजय केळकर हे उच्चशिक्षित, संयमी आणि अठरापगड जाती-समाजातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारे सुसंस्कृत नेतृत्त्व आहे. त्यांनी पक्षात कोणत्याही पदासाठी काम न करता नेहमीच शहराच्या विकासासाठी प्रयत्न केले. त्यामुळे केळकरांसारखा चेहरा मंञीमंडळात असावा, असे गाडे यांनी सांगितले.
Pune Crime : पुण्यात टोळक्याने महिलेचा कान कापला, दागिने चोरले; परिसरात खळबळ, नेमकं काय घडलं?
‘निकाल’ लागला, आता मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी, भाजप आमदाराला मंत्रिपद देण्याची मागणी
महायुतीतील घटकपक्षांच्या भूमिकेकडे लक्ष
ठाणे जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले असून १८ पैकी १६ जागांवर युतीचा झेंडा फडकला आहे. त्यामुळे जिल्ह्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या बड्या नेत्यांना मंत्रिपदाची स्वप्न पडत आहेत. त्यातच अशा आमदारांची संख्या अर्धा डझन असल्याने महायुतीतील घटक पक्षातील नेत्यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे.