• Mon. Nov 25th, 2024
    माहीमच्या किल्ल्यासाठी तिहेरी लढत, ‘राज’पुत्रासमोर सावंत-सरवणकरांचं आव्हान

    Mahim Shiv Sena Sada Sarvankar vs MNS Amit Thackeray vs Shiv Sena UBT Mahesh Sawant Vidhan Sabha Election 2024 Result: अमित ठाकरे येथून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळाचं लक्ष माहीम मतदारसंघाकडे लागले आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम
    Maharashtra Mahim Assembly Election Result 2024 in Marathi

    मुंबई : शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांचे जन्मस्थळ म्हणजे माहीम. या विधानसभा मतदारसंघात यावेळेस हे दोन पक्ष समोरासमोर उभे ठाकले आहेतच, मात्र शिवसेनेचे दोन्ही गट रिंगणात आहेत, त्यामुळे माहीममध्ये तिरंगी लढत होत आहे. विशेष म्हणजे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे येथून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळाचं लक्ष माहीम मतदारसंघाकडे लागले आहे.

    Live Update :
    – दुसरी फेरी
    – अमित ठाकरे पिछाडीवर, ठाकरे गटाचे महेश सावंत आघाडीवर, सदा सरवणकर तिसऱ्या क्रमांकावर
    – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलासा, सुपुत्र अमित ठाकरे पोस्टल मतमोजणीत आघाडीवर, सदा सरवणकर-महेश सावंत यांना सुरुवातीच्या कलांमध्ये धक्का

    माहीममधून अमित ठाकरे यांच्या विरोधात महायुतीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून महेश सावंत यांचे दुहेरी आव्हान आहे.

    अमित ठाकरे यांच्या विजयाचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी महायुतीतून बरेच प्रयत्न झाले. विशेषतः भाजपच्या नेत्यांनी सदा सरवणकर यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी विनंती केली, मात्र सरवणकर लढण्यावर ठाम राहिले. सरवणकर यांचे या मतदारसंघात स्थान आहे, तर महेश सावंत यांचीही मतदारसंघात चांगली पकड आहे. त्यामुळे ‘राज’पुत्राची वाट सोपी नाही.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *