• Mon. Nov 25th, 2024
    राज्यात सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग, परिवर्तन महाशक्तीचा पाठिंबा कुणाला? बच्चू कडू स्पष्टच म्हणाले…

    Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Parivartan Mahashakti: एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीचेच सरकार असे अंदाज बांधण्यात येत असले तरी कोणत्याच आघाडीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. यासाठी प्रमुख पक्षांना अन्य पक्षांची मदत लागणार आहे. यामध्येच परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीचीही भूमिका महत्वाची असणार आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    अमरावती : महाराष्ट्र राज्याच्या बहुप्रतिक्षित निकालाला अवघे काही तास उरले आहेत. यातच राज्याच घडलेल्या अभुतपूर्व घडामोडींमुळे यंदाची निवडणूक बहुचर्चित ठरली आहे. यातच एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीचेच सरकार असे अंदाज बांधण्यात येत असले तरी कोणत्याच आघाडीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. यासाठी प्रमुख पक्षांना अन्य पक्षांची मदत लागणार आहे. यामध्येच परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीचीही भूमिका महत्वाची असणार आहे. परिणामी सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळासाठी आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी दोन्ही प्रमुख आघाड्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे निकालापूर्वीच राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

    दरम्यान राज्यातील तिसऱ्या आघाडीची सत्तास्थापनेबद्दल काय भूमिका असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत आता आमदार बच्चू कडूंनी भूमिका स्पष्ट केली आहे. बच्चू कडू म्हणाले, आम्हाला महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडून संपर्क सुरू आहे. अद्याप आम्ही निर्णय घेतलेला नाही. एकदा कल हातात आला की आम्ही निर्णय घेऊ.
    फडणवीसांनी बोलावली भाजप नेत्यांची बैठक; तितक्यात राज ठाकरेंचा खास नेता दाखल; भुवया उंचावल्या
    बच्चू कडू पुढे म्हणाले, महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडून आम्हाला संपर्क करणे सुरू आहे. पण एकदा कल हातात आल्यानंतर मगच आम्ही निर्णय घेऊ, फोन दोन्हीकडून आलेले आहेत. पण आम्ही वेगळ्या सरकारचे स्वप्न पाहात आहोत.

    तर बच्चू कडूंनी निवडणुकीतील संभाव्य विजयावर देखील भाष्य केले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते जसे आम्हाला संपर्क करत आहेत, तसेच आम्ही देखील संपर्क करत आहोत. माझ्या पक्षाचे ४ ते ५ उमेदवार निवडून येतील, असा विश्वास आहे. तिसऱ्या आघाडीला घेऊन आम्ही सरकार बनवणार आहोत. कोणाला पाठिंबा देण्याऐवजी आपल्या सरकारचे स्वप्न पाहणे महत्वाचे आहे असे मला वाटते, पाठिंब्याची वेळ येणारच नाही, असेही बच्चू कडू यांनी म्हटले.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed