Maharashtra Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधी सोलापूर दक्षिण मतदारसंघातून शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांमधील राडा समोर आला आहे. खासदार प्रणिती शिंदेंच्या समर्थकांनी गाढवावर शरद कोळींचा पुतळा बसवला आणि निषेध केला.
काळ्या गाढवावरून शरद कोळीची मिरवणूक
खासदार प्रणिती शिंदेंचे कट्टर समर्थक शोएब महागामी यांनी गुरुवारी २१ नोव्हेंबर रोजी दुपारी कार्यालयासमोर काळा गाढव आणला. माध्यमांना प्रतिक्रिया देताना,संताप व्यक्त केला. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खा.प्रणिती शिंदेंच्या निर्णयाचा समर्थन केला.शरद कोळी यांच्या सारखा काळा गाढव आणून शरद कोळी असे संबोधित केले. खासदार प्रणिती शिंदे आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेवर बोलण्याची हिम्मत कशी काय झाली, अशा शब्दांत संतप्त प्रतिक्रिया दिली.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील का? एक्झिट पोलने दिले उत्तर! शिवसेनेला जास्ती जास्त इतक्या जागा मिळण्याचा अंदाज
काँग्रेस आणि शिवसेनेत जुगलबंदी
शरद कोळी सह शिवसैनिकांनी शिवसेनेच्या कार्यालयाबाहेर खासदार प्रणिती शिंदे व सुशीलकुमार शिंदेच्या कार्यालयाबाहेर जोडेमारून निषेध व्यक्त केला. शरद कोळी यांनी प्रणिती शिंदेंची गाडी फोडण्याचा इशारा दिला. गुरुवारी सकाळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी शरद कोळी यांच्या कार्यालया समोर थांबून माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि शरद कोळीची गाडी फोडण्यासाठी आलोय अशी प्रतिक्रिया दिली. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारा वरून शिवसेना (उबाठा)आणि काँग्रेसमध्ये जुगलबंदी सुरू झाली आहे.