• Tue. Nov 19th, 2024

    दिवंगत माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना राज्यपालांचे अभिवादन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Nov 19, 2024
    दिवंगत माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना राज्यपालांचे अभिवादन – महासंवाद




    मुंबई, दि. १९ : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी दिवंगत प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना त्यांच्या १०७ व्या जयंती दिनानिमित्त राजभवन येथे पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

    यावेळी राज्यपालांनी राजभवन येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. दरवर्षी १९ नोव्हेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय एकात्मता दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो.

    देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी निष्ठापूर्वक काम करण्याची तसेच सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद शांततामय आणि सांविधानिक मार्गाने सोडविण्याची सर्वांनी शपथ  घेतली.

    राज्यपालांचे प्रधान सचिव प्रविण दराडे, राज्यपालांच्या सह सचिव (प्रशासन) श्वेता सिंघल, परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवंगत इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

    0000

    Maha Governor offers floral tribute to Indira Gandhi

    Mumbai, 19th Nov : Maharashtra Governor C P Radhakrishnan offered floral tributes to the portrait of the Former Prime Minister of India Late Indira Gandhi at Raj Bhavan Mumbai on the occasion of her 107th birth anniversary on Tuesday (19th Nov).

    The Governor also read out the ‘National Integration Pledge’ to the staff and officers of Raj Bhavan on the occasion.

    Principal Secretary to the Governor Pravin Darade, Joint Secretary Shweta Singhal, Comptroller of the Governor’s Households Jitendra Wagh and officers and staff of Raj Bhavan were present.







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed