Vinod Tawde Reaction on Money Distribution Allegation : तीन तासांच्या प्रतीक्षेनंतर तावडेंनी बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर आणि भाजप उमेदवार राजन नाईक यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. मात्र आयोगाने आडकाठी करत त्यांची पत्रकार परिषद थांबवली.
हितेंद्र ठाकूर यांचे गंभीर आरोप
भाजप नेते विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप बविआचे नेते हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांनी केला. बविआ कार्यकर्त्यांनी तावडेंचा व्हिडिओ शूट करत त्यांना रोखून धरलं, त्यामुळे विनोद तावडे जवळपास तीन तासांपासून हॉटेलमध्येच अडकून पडले होते. धक्कादायक म्हणजे भाजप नेत्यांनीच आपल्याला यासंबंधी टिप दिल्याचा दावा ठाकूर यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तावडेंचा ठरवून गेम झाल्याची चर्चाही होत आहे.
Uddhav Thackeray : विनोद तावडेंच्या बॅगेत पैसे सापडल्याचं समजलं, तुळजाभवानीच्या पायरीवरुन ठाकरे कडाडले, खोकासूर…
हे पैसे हितेंद्र ठाकूर यांचे आहेत, असा उलटा दावा करु नका, अशी मिश्कील टिपणी यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी केली. पैसे माझे असतील, तर मला देऊन टाका, मला कामधंद्याला तरी होतील, असा टोलाही ठाकूरांनी लगावला. क्षितीज हा तावडेंना काका म्हणतो, आमचे जुने संबंध आहेत, असंही हितेंद्र म्हणाले. परंतु, विनोद तावडे यांना लाज वाटायला पाहिजे. माफ करा जाऊन द्या, असं म्हणत त्यांनी मला २५ फोन केले, असा दावा सुरुवातीला ठाकूरांनी केला होता. या घटनेमुळे दोन्ही गटात राडा झाल्यानंतर एकच खळबळ उडाली.
Vinod Tawde : पैसे वाटपाच्या आरोपानंतर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया, कुठेही आचारसंहिता भंग नाही, पण…
Vinod Tawde: तावडेंवर ५ कोटी वाटल्याचा आरोप, हितेंद्र ठाकूर भिडले; बॅगेतल्या डायऱ्यांमध्ये नेमकं काय?
ठाकरे काय म्हणाले?
महाराष्ट्रातील खोकासूर आणि भ्रष्टासूरांची राजवट संपून महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेल अशी राजवट येऊ दे, असं साकडं तुळजाभवानीला घातलं आहे, तुळजाभवानीच्या दर्शनाला येतानाही माझी बॅग तपासली गेली. बॅगेत तर काही सापडलं नाही, मात्र विनोद तावडेंच्या बॅगेत पैसे सापडल्याचं आताच तुमच्याकडून समजलं. मी आई तुळजाभवानीला साकडं घातलं आहे, भ्रष्ट राजवट एकदा या राज्यातून खतम करुन टाक, असं उद्धव ठाकरे म्हणाले.