• Sun. Nov 17th, 2024
    आरक्षणात आडवे येणाऱ्यांना पाडा; भुजबळांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगेंचे नागरिकांना आवाहन

    Yeola Vidhan Sabha Constituency: रक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडू नका. आता कस तुमचा आहे,’ असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येवला तालुका दौऱ्यात केले.

    महाराष्ट्र टाइम्स
    Manoj Jarange Patil OG.

    म. टा. वृत्तसेवा, येवला : ‘महाराष्ट्रात आरक्षणाला जे जे आडवे आले, त्यांचा सुपडासाफ करा. आरक्षणाला विरोध करणारा कोणीही असो त्याला पाडा. आरक्षणाला विरोध करणारा कोणीच सत्तेत राहायला नको, ही जबाबदारी तुमच्यावर आहे. आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडू नका. आता कस तुमचा आहे,’ असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येवला तालुका दौऱ्यात केले.

    येवला तालुक्यात जरांगे पाटील यांचे आगमन होताच मराठा समाजाच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. गवंडगाव फाटा येथे महेंद्रकुमार काले यांनी जरांगे यांचा सत्कार केला. या वेळी ‘एक मराठा, लाख मराठा’ आदी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘मराठा, ओबीसी, दलित, मुस्लिम या सर्वांनाच त्रास झाला आहे. आता बदला घ्यायची वेळ आली आहे. बदला घ्या,’ असे जरांगे पाटील म्हणाले. रायभान पाटील काळे, अशोक काळे उपस्थित होते. अंदरसूल येथेही जरांगे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
    मातोश्रीची दारे बंद, आम्हाला भेट नाकारलेली, शिंदेंच्या अपमानाचा मी साक्षीदार! प्रताप सरनाईकांचा गौप्यस्फोट
    ‘ज्याला पाडायचे त्याला पाडा, ज्याला आणायचे त्याला आणा. आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडू नका,’ असे जरांगे म्हणाले. संभाजी पवार, झुंजारराव देशमुख उपस्थित होते. पारेगाव येथे बाजार समिती संचालक सचिन आहेर यांच्या निवासस्थानी भेट देऊन जरांगे यांनी आहेर कुटुंबांचे सांत्वन केले. जरांगे यांचे तालुक्यात चिचोंडी, साताळी, भिंगारे, मुखेड, मानोरी बुद्रुक, देशमाने, पाटोदा आदी गावांमध्येही जोरदार स्वागत करण्यात आले.
    देवेंद्र फडणवीस vs प्रफुल्ल गुडधे; नागपूर-दक्षिण पश्चिम मतदारसंघात प्रचार शिगेला, कोण मारणार बाजी?
    ‘मी प्रचाराला आलो नाही’
    ‘मी प्रचाराला आलो नाही. सांत्वन भेटीसाठी आलो आहे. मराठा बुद्धिजीवी आहे. मी फक्त पाडा, असे सांगितले. मी कुणाचे नावही घेत नाही, घेतले नाही,’ असे जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. भुजबळांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना जरांगे म्हणाले, ‘मी टार्गेट केले नाही. त्यांनी समाजाला टार्गेट केले. माझा कोणालाच पाठिंबा नाही. पक्षाला, युतीला, आघाडीला आणि अपक्षालाही नाही. मात्र, आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा, असे सांगितले.’ या वेळी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके उपस्थित होते.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed