Nagpur News: विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासह कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस सज्ज झाले आहेत.
दिवसात विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासह कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस सज्ज झाले आहेत. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी गुन्हेगारांविरुद्ध कारवाईचे निर्देश पोलिस अधिकाऱ्यांना दिले असून, याअंतर्गत गेल्या २४ तासांत एकाचवेळी पोलिसांनी संपूर्ण उपराजधानीत गुन्हेगारांविरुद्ध ‘सर्जिकल स्ट्राइक’ केली. अवैध दारू विक्रीची ४९० गुन्हे गुन्हेगारांसह शहरातील विविध ठिकाणी अवैधपणे दारूविक्री करणारे व साठा करुन ठेवणाऱ्यांविरुद्धही पोलिसांनी मंगळवारी विशेष मोहीम राबवली. याअंतर्गत पोलिसांनी तब्बल ४९० गुन्हे दाखल करून ५२८ जणांविरुद्ध कारवाई केली.
प्रेमसंबंधातून बॉडीचे सात तुकडे, गोराईतील मृत्यूचं गूढ टॅटूमुळे उकललं, जीव घेण्यामागे धक्कादायक कारण
पोलिसांनी त्यांच्याकडून ११ लाख ७४ हजार ९०४ रुपये किमतीची दारू व अन्य साहित्य जप्त केले. सर्वाधिक कारवाई परिमंडळ एक अंतर्गत पोलिस उपायुक्तांच्या परिमंडळ एकअंतर्गत सर्वाधिक तडीपारीची कारवाई करण्यात आली. या परिमंडळांतर्गत तब्बल ७८ गुन्हेगारांना शहरातून बाहेर काढण्यात आले. या परिमंडळांतर्गत हिंगणा, वाडी, एमआयडीसी, सोनेगाव, प्रतापनगर व बजाजनगर पोलिस ठाण्याचा समावेश आहे. याशिवाय परिमंडळ दोन व तीन अंतर्गत प्रत्येकी चार, चार-तीन व पाच अंतर्गत १० गुन्हेगारांविरुद्ध तडीपार कारवाई करण्यात आली.
Amit Shah: मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही; अमित शहा यांची भूमिका, ‘मविआ’वर तुष्टीकरणाचा आरोप
कन्हानमधील सहा गुंडांविरुद्धही कारवाई
पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी कन्हानमधील विविध गुंडांच्या टोळीतील सहा सूत्रधारांना एक वर्षांसाठी शहर व जिल्ह्यातून तडीपार केले. यात कुख्यात कपिल अशोक रंगारी, कमलेश हरिश्चंद्र मेश्राम, अमन अन्वर खान, विशाल नामदेव चिंचोळकर, अविनाश उर्फ लंगडा सुखचंद शहारे व सोमेश भीमराव रामटेके आदींचा समावेश आहे.