Raj Thackeray attack on Sharad Pawar: राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केली. शरद पवारांबद्दल बोलायलाच नको, भूमिका पण लाजते, असे राज ठाकरे म्हणाले.
शरद पवारांना लक्ष्य करत राज ठाकरे म्हणाले, ‘शरद पवार हे आयुष्यभर भूमिका बदलत गेले. त्यांच्या बाबतीत बोलायलाच नको, भूमिका पण लाजते.’ शरद पवारांचा राजकीय इतिहास उलगडत राज ठाकरेंनी आता पवारांच्या भूमिकेवर बोट ठेवले. तर ‘मी माझ्या स्वार्थासाठी भूमिका बदलल्या नाहीत. या देशामधला पहिला माणूस मी होतो ज्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे अशी भूमिका घेतली. मला ज्या गोष्टी हव्या होत्या, त्याच्याविरुद्ध गोष्टी चालू केल्या. नोटा काय बंद झाल्या, पुतळे काय उभे राहिले,’ असे म्हणत भाजपच्या धोरणावरही बोट ठेवले. तर, २०१९ मध्ये अनेक गोष्टी चांगल्या झाल्या, त्यामध्ये कलम ३७० हटविणे असेल किंवा राम मंदिराची उभारणी असेल. त्यामुळे आपण त्यांना पाठिंबा दिला होता, असेही ठाकरेंनी नमूद केले.
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; राज ठाकरेंचा खोचक टोला
राजकीय नेत्यांच्या बॅग तपासणीच्या मुद्द्यावरुन देखील राज ठाकरेंनी भाष्य केले. ‘बॅग तपासली म्हणून काही जणांचं रडूबाई रडू सुरू आहे. पण, निवडणूक आयोगाला समजायला हवं, त्यांच्या हातामधून पैसे सुटत नाही, त्यांच्या बॅगेतून कसे पैसे निघणार, असे म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच, उद्धव ठाकरे यांनी अणुशक्ती प्रकल्पाला कोकणामध्ये विरोध केला आहे. आता ऑइल रिफायनरीला विरोध करत आहेत. त्यामुळे ते कोणत्या उद्योगपतीला मदत करत आहेत, हे कोणाचे लग्नाला जातात, असे सवाल देखील राज ठाकरेंनी उपस्थित केले.