• Mon. Nov 25th, 2024
    नवीन पैलवान येतील, मात्र वस्ताद एकच…काहीही करा पण पवार साहेबांचा नाद करू नका; रोहित पवारांचं फडणवीसांवर टीकास्त्र

    Rohit Pawar Criticize Devendra Fadnavis : रोहित पवार यांनी युगेंद्र पवार यांच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत काहीही करा पण पवार साहेबांचा नाद करू नका, असा इशाराच दिला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    दीपक पडकर, बारामती : भाजप नेते म्हणतात ‘बटेंगे तो कटेंगे’, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेगळंच म्हणतात. अमित शहांचं तर ‘लईच’ भारी. लोकसभा निवडणुकीदरम्यान ते महाराष्ट्रात आले आणि म्हणाले की, “पवार साहाब” मै आपसे पूछ रहा हु दस साल मे आपने क्या किया बताओ..! याचा पुरावा ते मागत होते. त्यांना लोकसभेत लोकांनी पुरावा दिला. थेट २३ वरून ९ वरच आकडा आणला. पवार साहेबांनी काय केलं आहे. हे अख्ख्या दुनियेला माहित आहे आणि ते विचारतात पवार साहेबांनी काय केलं? अशी खोचक टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली.
    सागर बंगल्यातून द्वेषाचं राजकारण, बंगल्यातील नेता दीड महिन्यानंतर घरी बसणार; रोहित पवारांचा दावा
    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ आमदार रोहित पवार आज बारामतीत आले होते. यावेळी त्यांनी सुपे येथे ग्रामस्थांशी संवाद साधला. पुढे बोलताना ते म्हणाले की, कोल्हापूरलाही असेच कोणीतरी म्हणाले. त्यांना मी सांगू इच्छितो की, दहा दिवस थांबा. १७० ते १८० महाविकास आघाडीचे आमदार निवडून येणार, असा विश्वास यावेळी रोहित पवार यांनी व्यक्त केला.
    Sharad Pawar : मला त्या रस्त्याने जायचे नाही, पण तुम्हाला दम दिला तर मला कळवा; शरद पवार आक्रमक, नेमकं घडलं तरी काय?
    ‘पवार साहेब गेल्या साठ वर्षांपासून राजकारणात आहेत. त्यांनी दिलेला शब्द प्रामाणिकपणे पाळला. पवार साहेब जे शब्द देतात, ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना चॅलेंज केले होत की, पवार साहेबांचं राजकारण आता संपलं आहे. नवीन पैलवानाची आवश्यकता आहे.’

    नवीन पैलवान येतील, मात्र वस्ताद एकच…काहीही करा पण पवार साहेबांचा नाद करू नका; रोहित पवारांचं फडणवीसांवर टीकास्त्र

    ‘फडणवीस कसे पैलवान झाले हे मला माहित नाही. त्यांना बघून वाटतही नाही ते पैलवान आहेत. भले ही नवीन पैलवान येतील, मात्र वस्ताद एकच असतो आणि वस्ताद इतका हुशार असतो की, तो एखादा डाव राखून ठेवतो. मात्र पवार साहेब हे वस्ताद, वस्तादाचे वस्ताद असल्याने त्यांच्याकडे शेकडो डाव आहेत. तुम्ही काहीही करा पण पवार साहेबांचा नाद करू नका,’ असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांवर आमदार रोहित पवार यांनी जळजळीत टीका केली.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed