Raigad News: आदिवासी महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह झोळीत टाकून नेण्याची वेळ आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पेण सुधागडचे विद्यमान आमदार रवी पाटील यांच्या घरापासून फक्त ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या खवसावाडी येथे झाली.
पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव नदीतील खौसावाडी आदिवासी वाडी येथे साठ लाख रुपये खर्चूनही प्रत्यक्षात रस्ताच नसल्यामुळे गुरुवार दिनांक ०७ नोव्हेंबर रोजी आंबि राघ्या कडू वय ४२ वर्ष ह्या आदिवासी मृत महिलेचा देह पेण ते खवसावाडी असे सुमारे पाच किलोमीटर झोळीत टाकून न्यावा लागल्याने आदिवासी समाजाला वालीच उरला नसल्याचे भयाण वास्तव समोर आले आहे.
लाडकी बहीण संदर्भात केलेले विधान धनंजय महाडकांना भोवले; आयोगाने आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे म्हणत दाखल केला गुन्हा
दरम्यान ग्राम संवर्धन सामाजिक संस्था ही सामाजिक संस्था मागील दोन वर्षांपासून येथील खवसावाडी, काजुचीवाडी,केळीचीवाडी, तांबडी, आणि उंबरमाळवाडी ह्या पाचही आदिवासी वाड्यांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. मागील दोन वर्षांत रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासह संबंधित सर्व विभाग कार्यालांयावर मोर्चे आंदोलने काढून ह्या आदिवासींच्या वाट्याला आलेला विकास निधी रायगड जिल्हा परिषद पेण उपविभागाचे अभियंता आणि ठेकेदारांनी गीलंकृत केला असून याबाबतची माहितीच्या अधिकारात माहिती मागवली असतात तीही देण्यात आलेली नाही.
राज्यातील भाजपच्या राष्ट्रीय नेत्याने सांगितला निवडणुकीचा निकाल; अजित पवारांना फक्त २५ जागा, मविआमध्ये ठाकरे गटाचा स्ट्राइक रेट सर्वात…
विशेष म्हणजे ह्याच आदिवासी वाड्यांच्या रस्त्यांसाठी ०१ जानेवारी २०२४ रोजी पुन्हा एकदा सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला ७ कोटी ६० लाख रुपयांचा ठेका देण्यात आला आहे. मात्र आज १० महिने उलटूनही ह्या रस्त्याचेही काम ठेकेदाराने सुरू केलेला नाही. त्यामुळे येथील आदिवासीना मात्र रस्त्या अभावी वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यूला कवटाळावे लागते. अशा परिस्थितीत पेण सुधागड मतदार संघाचे विद्यमान आमदार रवींद्र पाटील यांचे निवासस्थानापासून चार ते पाच किलोमीटर वर असलेल्या ह्या वाड्यांमध्ये आमदार एकदाही पोहोचले नसल्याचे येथील आदिवासी बांधवांचे म्हणणे असून याबाबत आदिवासी समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.