• Mon. Nov 25th, 2024

    आचारसंहिता भंगाच्या २४५२ तक्रारी निकाली; २५३ कोटींची मालमत्ता जप्त – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Nov 24, 2024
    आचारसंहिता भंगाच्या २४५२ तक्रारी निकाली; २५३ कोटींची मालमत्ता जप्त – महासंवाद




    मुंबई, दि. ४: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी  १५ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण 2469 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 2452 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

    नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

    253 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

    राज्य व केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण 253 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे.

    ०००







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed