• Mon. Nov 25th, 2024
    भाजप आमदार गायकवाडांची पत्नी आणि मविआ उमेदवार दरेकरांचं गुफ्तगू, छुप्या पाठिंब्याच्या चर्चा

    कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि विद्यमान शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. भाजप आणि महायुतीचे मित्रपक्ष श्रीकांत शिंदे यांना विजयी करतील अशी घोषणा फडणवीसांनी केली होती. आमदार गणपत गायकवाड समर्थकांच्या भूमिकेमुळे कल्याणमध्ये भाजप आणि शिंदे गटात निर्माण झालेला तणाव कमी करण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला होता. मात्र नववर्ष स्वागत यात्रेच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर आणि गणपत गायकवाड यांच्या पत्नी एकत्र आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

    कल्याण पूर्व येथील गुढीपाडवा स्वागत यात्रेत कल्याण लोकसभेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाडही या ठिकाणी उपस्थित होत्या. यावेळी दोन्ही महिला नेत्यांनी एकमेकींना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. याच बरोबर एकमेकांसोबत फोटोही काढले. याबाबत समाजमाध्यमांवर छायाचित्रही प्रसारित झाले. त्यानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थक आणि ठाकरे गट यांच्यात छुपी युती तर नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. आता याचे पडसाद निवडणुकीत पाहायला मिळतील अशी चर्चा होत आहे.
    राज ठाकरेंचं महायुतीला समर्थन, पुण्यात मनसेच्या मतांचं विभाजन? धंगेकर-मोरे मतं खाण्याची चर्चा
    भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर शिवसेनेनेही आक्रमक भूमिका घेत गुंड प्रवृत्तीचे समर्थक अपप्रचार करत महायुतीत मिठाचा खडा टाकणार असतील तर त्याचे परिणाम शेजारच्या मतदारसंघात पाहायला मिळतील असा इशारा दिला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी श्रीकांत शिंदे शिवसेनेचे उमेदवार असतील आणि महायुती त्यांना विजयी करेल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. त्यानंतर आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी पुढे येत श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत कल्याण पूर्व मतदारसंघात मतभेद नसल्याचे बोलले जात होते.
    शरद पवार गटाची तिसरी उमेदवार यादी घोषित, सातारा-रावेरमधून तिकिटं जाहीर, माढ्याचा तिढा कायमRead Latest Maharashtra News Updates And Marathi News

    मात्र गुढीपाडव्याच्या निमित्ताने कल्याण पूर्वेत आमदार गणपत गायकवाड आयोजित नववर्ष स्वागत यात्रेच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे सहभागी झाल्या. यावेळी आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड सुद्धा उपस्थित होत्या. याबाबत समाजमाध्यमांवर छायाचित्रही प्रसारित झाले. त्यानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *