मनसेचे कार्यकर्ते सांगतात, दादागिरी करणाऱ्या पक्षांची मुजोरी जनता पाहात आहे. त्यांच्या मनातील ही रागाची ठिणगी मतपेटीच्या माध्यमातून वणवा पेटवणार आहे. या घाणेरड्या राजकारणाला जनता हसत असेल किंवा दूषणे देत असेल. प्रादेशिक नेत्यांचा अपमान होत असल्याची भावना मतदारांमध्ये आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी कठोर निर्णय घेऊन या रागाला मोकळी वाट करून द्यावी. त्यासाठी तिसरी आघाडी निर्माण करावी, अशी भावना तयार झालेली आहे.
‘प्रादेशिक पक्षांची बांधावी मोट’
राज ठाकरे यांनी मनसे, वंचित बहुजन आघाडी, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा सकल मराठा समाज पक्ष, आम आदमी पक्ष, स्वराज्य पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचे छोटे-मोठे गट, संभाजी ब्रिगेड, अशा सर्व प्रादेशिक उपेक्षित पक्षांना घेऊन तिसरी आघाडी बनवावी आणि जनतेला एक सक्षम पर्याय उपलब्ध करून द्यावा.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
मतदार या पर्यायाचे निश्चित स्वागत करतील, असे मनोज घोडके, अमित गांगुर्डे, निखिल सरपोतदार, देवचंद केदारे, संदीप दोंदे, अर्जुन वेताळ, नितीन दानापुणे, नितीन पंडित, सत्यम खंडाळे, धीरज भोसले, नितीन माळी, भाऊसाहेब निमसे, रोहन जगताप आदींनी सांगितले.