• Mon. Nov 25th, 2024
    Nana Patole Accident: नाना पटोलेंच्या गाडीला भीषण अपघात, वाहनाला ट्रकची जोरदार धडक अन्…

    भंडारा: भंडार गोंदिया लोकसभा क्षेत्राच्या निवडणूक प्रचाराने जोर पकडला असून काल रात्री एक अप्रिय घटना घडून आली. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला एका ट्रकने मागून धडक दिली. यात नाना पाटोले सुखरूप बचावले असले तरी मागे पुढे सुरक्षा असताना सुद्धा असा अपघात घडल्याने घटनेनंतर राजकीय क्षेत्रात चर्चेला आणि आरोप प्रत्यारोपन्ना उधाण आले आहे. भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ काल रात्री हा अपघात झाला. प्रचार आटोपून सुकळी या स्वगावी परत जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली.

    महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांना या निवडणुकीत नाना पटोले यांचाच दूसरा चेहरा मानला जात असून या निवडणुकीला नानांनी अधिकच गांभीर्याने घेतले आहे आणि त्यांच्या प्रचार करीत दिवस रात्र एक केली आहे. अशातच कालच्या प्रचार सभा आटोपून नाना पाटोले ही आपल्या ताफ्यासोबत रात्रीच्या सुमारास भंडारा येथून स्वगावी जायला निघाले. दरम्यान भंडाऱ्यावरुन पाच किलोमीटर अंतरावरील भीलवाडा गावाजवळ त्यांच्या ताफ्याला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका अनियंत्रित ट्रकने जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की नाना पटोले यांच्या गाडीचा मागच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. मात्र नशीब बलत्तर असल्याने नानांना अथवा गाडीतील कुणालाही दुखापत झाली नाही. अपघातानंतर नाना पटोलेंनी याची माहिती भंडारा पोलिसांना दिली आणि माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थाळ गाठून कारवाईला सुरुवात केली.

    राजकीय हेतूने घातपाताचे आरोप

    कल रात्री झालेल्या अपघाताची बातमी कळताच राजकीय क्षेत्रात चर्चे सोबतच आरोप प्रत्यारोपाने जोर पकडले आहे. या अपघातानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी संतापले असून नाना पटोले यांच्या वाहनाला झालेला अपघात हा अपघात नसून राजकीय घातपाता असलत्याचा आरोप कार्यकर्ते करीत आहेत. नाना पाटोले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या उमेदवारीला आपल्या अस्तित्वाची निवडणूक मनाली असून त्यांनी आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी अख्खा जिल्हा पिंजून काढला आहे. यामुळे विरोधकांना याची धडकी भरली असून त्यातून घडलेला हा प्रकार असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलेला आहे. दरम्यान या घटनेची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्ते करीत असून पोलिसांनी ट्रक चलकस ताब्यात घेऊन गांभीर्याने विचारपूस सुरू केली आहे.

    विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? – अतुल लोंढे

    “विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का ? अशी शंका आहे. मायबाप जनतेच्या आशिर्वादाने नाना पटोले साहेबांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत”, अशी पोस्ट प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली असून त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

    भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार आता दुसऱ्या टप्प्यात आल्याने त्यात रंगत आली आहे. निवडणुकीत अपक्ष उमेदवार असणे ही काही नवीन बाब नाही. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात एकूण रिंगणात असलेल्या १८ उमेदवारांमध्ये ११ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे, तर यातील दोन-तीन अपक्ष उमेदवार वगळता इतर अपक्ष उमेदवार मतदारसंघात प्रचारात कुठे दिसत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ११ अपक्ष उमेदवार रिंगणात पण त्यापैकी प्रभावी उमेदवार किती, असा प्रश्न यानिमित्ताने पुढे येत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी १९ एप्रिलला मतदान होणार आहे. महायुती, महाविकास आघाडी, बसपा, वंचित उमेदवारांच्या प्रचारार्थ त्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा होत आहेत. त्यामुळे निवडणुकीत आता रंगत आली आहे. सर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार सभा, मेळावे, रॅली काढून मतदारांपर्यंत पोहोचत आहेत; पण दोन- तीन अपक्ष उमेदवार वगळता इतर अपक्ष उमेदवार कुठेच दिसत नसल्याने त्यांची उमेदवारी ही केवळ आनंद घेण्यासाठी का, असा सूर मतदारांमधून उमटत आहे. आता कोणतीही निवडणूक लढविणे सहज शक्य राहिली नाही. शिवाय लोकसभा मतदारसंघाचा विस्तार मोठा आहे. त्यातच प्रचारयंत्रणा राबविणे ही बाबदेखील खर्चिक आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणे सोपे असले तरी त्या पुढील प्रक्रिया राबविणे तेवढे सोपे नाही. सध्या प्रमुख पक्षांचे उमेदवार हे दिवसरात्र एक करून प्रचारात व्यस्त दिसत आहेत, तर दोन- तीन अपक्ष उमेदवार वगळता इतर अपक्ष उमेदवार गेले कुठे, -असा प्रश्न मतदारांकडून केला जात आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *