आमदार विक्रम सावंत आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना बुधवारी दुपारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत सविस्तर चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, असे सांगितले आहे. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक मनोज सरगर यांच्यासह काही पदाधिऱ्यांनी जागेबाबत झालेल्या निर्णयाचा निषेध करून पक्षपदाचे राजीनामे देण्याचा इशारा दिलेला आहे. समाजमाध्यमांतून ‘आता जनतेच्या कोर्टात जाऊन न्याय मागू या,’ अशा पोस्ट सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाल्या आहेत.
‘जत पॅटर्न’ चर्चेत
लोकसभेची सांगलीची जागा न मिळाल्याने नाराज झालेल्यांमधून सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत जत विधानसभा निवडणुकीतील झालेल्या ‘काँग्रेस पॅटर्न’ची चर्चा जोर धरू लागली आहे. ‘त्या वाटेने जाऊया,’ असेही काहींचे मत आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
त्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत जतची जागा राष्ट्रवादीकडे गेल्याने काँग्रेस कमालीची नाराज झाली होती. त्या वेळची काँग्रेसची नाराजी टोकाला गेली होती. संपूर्ण तालुका काँग्रेस बरखास्त करून सर्व जण तत्कालीन भाजपचे उमेद्वार प्रकाश शेंडगे यांच्या पाठीशी उभे ठाकले होते. त्यात शेंडगे यांचा विजयही झाला होता. त्या ‘पॅटर्न’चा अवलंब व्हावा, असे कार्यकर्ते म्हणत आहेत.